नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल या दोन्ही बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली. आरबीआयने बँक ऑफ इंडियावर 4 कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक स्थिती संदर्भात तपासणी केली गेली. जोखीम मूल्यांकन अहवालाच्या तपासणीत असे दिसून आले की, या प्रकरणात निकषांचे पालन केले जात नाही, त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मोठा गाजावाजा करत सुरु केलेली आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश' https://t.co/yT3Df6CfSt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांच्यावर कारवाई केली. त्यापैकी एक प्रकरण ‘फसवणुकीचे वर्गीकरण आणि त्यासंदर्भात अहवाल देणे’ या नियमांशी संबंधित आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बँक ऑफ इंडियावर 4 कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 31 मार्च 2019 रोजी बँक ऑफ इंडियाच्या एलएसईसाठी वैधानिक तपासणी केली गेली. खात्याने केलेली फसवणूक शोधण्यासाठी बॅंकेने एक आढावा घेतला आणि फसवणूक मॉनिटरिंग रिपोर्ट सादर केला. आरबीआयने एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, पंजाब नॅशनल बँकेची आर्थिक स्थितीच्या संदर्भात तपासणी केली गेली. केंद्रीय बँकेने असे म्हटले आहे की जोखीम मूल्यांकन अहवालाच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, या प्रकरणांमध्ये निकषांचे पालन केले जात नाही.
आरोग्य विभागात मेगा भरती; 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी https://t.co/vZc46WsuXy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021