पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे-पिरंगूट एमआयडीसीमधील एसव्हीएस ॲक्वा टेक्नॉलॉजी या कंपनी लागलेल्या आगीत १८ कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंपनी मालक निकुंज शाह यास 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीसाठी केंद्राकडून दर जाहीर https://t.co/OVkX5DzHOw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. या भीषण आगीच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे मालक निकुंज बिपीन शहा, बिपीन जयंतीलाल शहा, केयुर बिपीन शहा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
जगभरातील इंटरनेट काही काळासाठी ठप्प https://t.co/ssACGqMktO
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच केंद्र सरकारने देखील मदत जाहीर केली आहे. केंद्र सरकार मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई, कोकण, पुण्यात येत्या दोन ते तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा, धुळ्यात अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
https://t.co/bk3pa5Wo8e— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
* आठच दिवसांपूर्वी लागली होती छोटी आग
या कंपनीत आठच दिवसांपूर्वी छोटी आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. या आगीनंतरच या कंपनीने भविष्यात आग लागू नये याची काळजी घ्यायला हवी होती. मात्र, तशी काळजी घेतलेली दिसत नाही. तशी काळजी घेतली गेली असती तर मोठी आग लागून मनुष्यहानी झाली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आगीची घटना घडल्यानंतर या आगीची सविस्तर चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशी समितीने आपल्या चौकशीचा अहवाल येत्या दोन दिवसात द्यावा असे आदेश या समितीला देण्यात आले होते.
या दोन मोठ्या बँकांवर आरबीआयची कारवाई, ठोठावला 6 कोटींचा दंड, अहवालात निष्काळजीपणाचा ठपकाhttps://t.co/vQYd2ei2ZY
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021