नवी दिल्ली : मोदी कॅबिनेटने चालू खरीप विपणन हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. विविध पिकांच्या किंमतीत 50 टक्के ते 62 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत कॅबिनेटची बैठक पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असे ट्वीट करुन म्हटले आहे.
अन्नदाताओं के हित में आज केंद्रीय मंत्रिमंडल ने खरीफ फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य में बढ़ोतरी को मंजूरी दी है। कई फसलों के एमएसपी में वृद्धि से किसान भाई-बहनों की आय बढ़ने के साथ उनके जीवन स्तर में भी सुधार होगा।https://t.co/iRnR3vgRjf
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2021
केंद्र सरकारने पुन्हा एकदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, भातवरील किमान आधारभूत किंमतीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर1868 रुपये प्रतिक्विंटलपासून भात आता प्रतिक्विंटल 1940 रुपये झाला आहे. यासह बाजरीवरील किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटलवर करण्यात आली आहे.
खरीप विपणन हंगाम 2021-22 साठीच्या किमान हमी भावाला #Cabinet ची मंजुरी
गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान हमी भावातील सर्वाधिक वाढ तीळाला (452 रुपये प्रति क्विंटल) देण्याची शिफारस
त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला (प्रत्येकी 300 रुपये प्रति क्विंटल) देण्याची शिफारस –@nstomar
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) June 9, 2021
कृषीमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या 7 वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. देशातील सर्व पक्षांना कृषी कायदा आणायचा होता. परंतु त्यांची हिंमत होऊ शकली नाही. भारत सरकारने 11 वेळा शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा शेतकरी चर्चेसाठी तयार असतात, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असतो.
किमान आधारभूत किंमत 2018 पासून किंमतीवर 50 टक्के परतावा जोडून घोषित केली जाते. चालू खरीप विपणन हंगामासाठी (KMS) 2020-21 (6 जून 2021 पर्यंत) गेल्या वर्षीच्या 736.36 LMT च्या तुलनेत किमान आधारभूत किंमतीवर LMT पेक्षा जास्त धान्य खरेदी केले गेले, ज्यामुळे शेतकर्यांना यांचा फायदा झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी की अध्यक्षता वाली आर्थिक मामलों की मंत्रिमंडलीय समिति ने कृषि उपज की सरकारी खरीद, सीजन 2021-22 के लिए सभी खरीफ फसलों के न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) में बढ़ोतरी को दी स्वीकृति…@AgriGoI pic.twitter.com/o8gg6U3RZz
— Narendra Singh Tomar (@nstomar) June 9, 2021
कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एकामागून एक कृषी क्षेत्रात मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. शेतीला फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी काम केले गेले.
शेतकरी आंदोलनावर कृषीमंत्री म्हणाले की, देशातील सर्व पक्षांना कृषी कायदा आणायचा होता. परंतु त्यांची हिंमत होऊ शकली नाही. भारत सरकारने 11 वेळा शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा शेतकरी चर्चेसाठी तयार असतात, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असतो.
* पीक आणि त्याची आधारभूत किंमत
– धान्य (सामान्य)- 1940 रुपये (आधारभूत किमतीत वाढ- 72 रुपये)
– धान्य (ग्रेड ए) – 1960 रुपये (आधारभूत किमतीत वाढ- 72 रुपये)
– ज्वारी (हाईब्रिड)- 2738 रुपये (आधारभूत किमतीत वाढ- 118 रुपये)
– ज्वारी (मालदांडी) – 2758 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ- 118 रुपये)
– बाजरी – 2250 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ – 100 रुपये)
– नाचणी – 3377 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ- 82 रुपये)
– मका – 1870 रुपये (आधारभूत किमतीत वाढ -20 रुपये )
– तूर – 6300 रुपये – ( आधारभूत किमतीत वाढ- 300 रुपये)
– उडीद – 7275 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ -79 रुपये )
– भुईमूग – 5550 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ- 275 रुपये )
– सूर्यफूल बियाणे – 6015 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ – 130 रुपये)
– सोयाबीन – 3950 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ – 70 रुपये)
– तीळ – 7307 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ – 452 रुपये)
– कापूस (मध्यम रेशा) – 5726 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ – 211 रुपये)
– कपास (लांब रेशा) – 5025 रुपये ( आधारभूत किमतीत वाढ- 200 रुपये )
खासदार नवनीत राणा, जयसिद्धेश्वर स्वामींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा https://t.co/Qjxb9JJGGP
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021