नाशिक / मुंबई : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कोरोनावरील लस होय. पण हीच लस घेऊन तुमच्या शरीरात समजा चुंबकत्व निर्माण झाले आणि शरीराला सर्व वस्तू अचानक चिटकायला सुरूवात झाली तर यामुळे तुमचाही गोंधळ उडेल. असाच प्रकार नाशिक येथील जेष्ठ नागरिकाबरोबर घडला आहे. नाशिकातील सिडको शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत.
मुंबईत इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी https://t.co/acr2dpt60m
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
कोरोना लस घेतल्यानंतर अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू तसंच नाणी चिकटत असल्याची अजब घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून त्यावरुन आश्चर्य व्यक्त होत आहे. ७२ वर्षीय अरविंद सोनार यांनी आपण कोरोना लस घेतल्यापासून अंगाला या वस्तू चिकटत असल्याचा दावा केला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी लसीचा आणि वस्तू चिकटण्याचा काही संबंध नसल्याचं सांगत दावा फेटाळला आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार संबोधित करताना #ncp #surajyadigital #sharadpawar #राष्ट्रवादीhttps://t.co/7UwVW6JSZs
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद सोनार यांनी ९ मार्चला करोनाची लस घेतली होती. यावेळी त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. यानंतर २ जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांच्या मुलाने टीव्हीवर एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी साहित्य चिकटत असल्याचं पाहिलं होतं. म्हणून त्याने घरी आई-वडिलांवर प्रयोग करुन पाहिला असता वडिलांच्या शरिराला लोखंड, स्टील आणि नाणी चिकटत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने तात्काळ खासगी डॉक्टरांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
नाशिक महापालिकेने या घटनेची दखल घेतली असून आरोग्य पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. अरविंद सोनार यांची तपासणी केली जात असून नेमका काय प्रकार आहे याची पाहणी केली जात आहे. वेळ पडल्यास त्यांच्या रक्ताची तपासणीही केली जाणार आहे.
सोलापुरात स्मार्टसिटीच्या ट्रॅक्टरखाली चेंगरून दत्तचौकात बालकाचा मृत्यू https://t.co/dkJesgLkRg
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“अरविंद सोनार यांनी सरकारी दवाखान्यात पहिली लस घेतली होती. ९० दिवसांनी अपोलो रुग्णालयात त्यांनी दुसरी लस घेतली. त्यानंतर त्यांच्या शरीरावर स्टील वैगेरे वस्तू चिकटत आहेत. त्यांची तपासणी केल्यानंतर हे नेमकं कशामुळे होत आहे हे स्पष्ट होईल. आतापर्यंत साडे तीन लाखांहून जास्त लोकांना लस देण्यात आली असून इतर व्याधींमुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता कमी आहे,” असं पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
“अंगाला वस्तू चिकटत असतील तर तपासणी केली पाहिजे. आतापर्यंत अनेकांना लस देण्यात आली असून एखाद्याच्या अंगाला वस्तू चिकटत असतील तर त्याचा लसीशी काही संबंध नााही. शास्त्रीयदृष्ट्या हे शक्य नाही. त्यांच्या त्वचेशी संबंधित एखादी गोष्ट असू शकते जे तपासणीनंतर स्पष्ट होईल, पण याचा आणि लसीचा काही संबंधी नाही”, असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.
…त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, शरद पवारांच्या भाषणाचे अनेक अर्थ https://t.co/l6oEg3tjov
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
डॉ. लहाने पुढे म्हणाले, “मुळात लोखंडाच्या वस्तू शरीराला चिटकतात याबाबत आपण यापूर्वी ऐकलं आहे. आणि अशा प्रकारच्या चर्चा होत असतात. मात्र यावर संशोधन केलं असता वैज्ञानिकदृष्ट्या याला पुरावा नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे जर कोणाला असं काही होत असेल तर त्यांनी डॉक्टरांची मदत घ्यावी. याचा लसीकरणाशी तीळमात्र संबंध नाही.”
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही हा चमत्कार नसून घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. हा विज्ञानाचा एक भाग असून वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता, येईल असं त्यांनी सांगितलं आहे.
चहावाल्याकडून मोदींना दाढी कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर, वाचा त्या चहावाल्याने पाठवलेले पत्र https://t.co/HuFtZVWFc1
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021