पुणे : आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. शिवाय उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येक 50 वारकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. यंदा 10 पालख्यांसाठी 20 बस देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पंढरपूरला यंदाही बसमधूनच पालखी सोहळा नेण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत. त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी #surajyadigital #उपमुख्यमंत्री #आषाढी #वारी #import #Pawar #पालख्या #सुराज्यडिजिटल #अजितपवार pic.twitter.com/jTyg5yPqMM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची एक बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणााले की, देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार आहे. तर उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार आहे.
अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
रिंगण आणि रथोत्सावाला केवळ 15 वारकऱ्यांना परवानगी राहणार आहे. तसेच वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. देहू आणि आळंदी येथून 100 वारकऱ्यांना परवानगी दिली जाईल. तर 10 बसमधून 20 पालख्या नेण्यात येणार आहेत. या सोहळ्यात कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायानं मागणी केली होती. त्याबाबत वारकरी संप्रदायातील प्रमखांची बैठकही झाली. त्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचे श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे प्रशासक ॲड. भाऊसाहेब गंभीरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.