मुंबई : काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला, तेव्हा काँग्रेसची विचारधारा कुठे गेली होती? असा सवाल जितिन प्रसाद यांनी केला आहे. प्रसाद यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. यानंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी विचारधारेवरून त्यांना काही प्रश्न केले होते. लोक विचारधारेपेक्षा आपला फायदा जास्त पाहतात, असे सिब्बल यांनी म्हटले होते. यानंतर प्रसाद यांनी सिब्बल यांना उत्तर दिले आहे.
आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या https://t.co/Juy9rLG9ke
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
काँग्रेसला सोडचिट्ठी देत जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . यावरून आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जितीन प्रसाद यांनी विचारसरणी बाजूला ठेवून भाजपात प्रवेश केल्याची टीका काँग्रसेचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली होती. यावर जितीन प्रसाद यांनी पलटवार केला असून शिवसेनेसोबत युती केली तेव्हा नेमकी पक्षाची काय विचारसरणी काय होती? असा सवाल त्यांनी कपिल सिब्बल यांना विचारला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेसने शिवसेनेसोबत युती केली तेव्हा विचारसरणी कुठे होती? पश्चिम बंगालमध्ये डाव्यांसोबत गेले तेव्हा काय विचारसरणी होती? आणि त्याच वेळेला ते केरळमध्ये डाव्यांसोबत लढत होते,” असं सांगत जितीन प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीविरोधात वक्तव्यं केल्याने पक्षाचं नशीब बदलणार नाही असा टोलाही यावेळी त्यांनी सिब्बल यांना लगावला आहे.
अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
दरम्यान भारतीय राजकारणात आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे अशापद्दतीचे निर्णय विचारसणीच्या आधारे अजिबात घेतले जात नाहीत. याआधी हे ‘आया राम गया राम’ होते , आतात ‘प्रसाद राम राजकारण’ आहे, अशी टीका सिब्बल यांनी जितीन प्रसाद यांच्यावर केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी #surajyadigital #उपमुख्यमंत्री #आषाढी #वारी #import #Pawar #पालख्या #सुराज्यडिजिटल #अजितपवार pic.twitter.com/jTyg5yPqMM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021