पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जमखी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पुण्यामधून जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला जात असताना गाडीचा टायर फुटल्याने घटना घडली.
अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
नंदकिशोर भाऊसाहेब जोगदंड, सौदागर दगडु उंप (वय.३५ रा.दोन्ही लातुर) यांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला. चालक नवनाथ खंडु कांबळे (वय.२८ रा. लातूर) हा गंभीर जखमी झाला आहे. चालक गंभीर जखमी झाला आहे. गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. गाडीतील जखमी व मृतांना गाडीबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुुुुसार, लातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील दोघे चालकांसह पुणे येथे जुनी गाडी खरेदीसाठी आले होते. ती घेऊन गावी जात असताना या महामार्गावरील उतारावर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोघांच्या डोक्याला व संपूर्ण शरीराला गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले.
आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या https://t.co/Juy9rLG9ke
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटारकारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीतील दोघे जागीच ठार झाले होते. तर चालकांस गाडीतून बाहेर काढण्यात आले. जखमीवर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अधिक तपास भिगवण पोलिस करीत आहेत.