Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

“प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका”

Surajya Digital
Last updated: 2021/06/12 at 9:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अमरावती : येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोरोना रुग्णालयांना भेट देण्यासाठी नाना पटोले सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा झाली? राष्ट्रवादीचा खुलासा, पहा व्हिडिओhttps://t.co/boMdwxaLrW

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, नक्षलवादी हे लोकतांत्रिक पद्धतीचा विरोध करतात, त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने पटोले यांना विचारण्यात आलं, त्यावर नाना पटोले म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती आणि वंचित आघाडी एकत्र आले तर त्याचा फटका शिवशाहीला नव्हे तर पेशवाईला बसेल”

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मराठा आरक्षणासाठी आता गुळगुळीत आंदोलन नको, मंत्र्यांच्या गाड्या फोडा, मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? https://t.co/4EruBnYNVt

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

नाना पटोले यांनी काल अकोल्यात बोलताना, प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे संकेत दिले होते. . 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले आहे. अमरावती लोकसभेसाठी पोट निवडणूक झाल्यास ती कोण लढवणार? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे त्यामुळे अमरावतीची जागा काँग्रेस लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा, सर्व राजभवनांसमोर निदर्शने https://t.co/elQfKyculo

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021

* भाजपची मोठी लिस्ट तयार

काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटलं, भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत, माझ्याकडे मोठी लिस्ट तयार आहे. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असलेले ते भाजप नेते कोण? असा सवालही विचारला जात आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #PrakashAmbedkar #SambhajiRaje #together #Peshwa #Shivshahi, #प्रकाशआंबेडकर #संभाजीराजे #एकत्रआल्यास #शिवशाहीला #पेशवाईला #फटका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा झाली? राष्ट्रवादीचा खुलासा
Next Article झेड दर्जाची सुरक्षा, ज्योतिरादित्यांचा ताफा अडवून दिले ‘बेशरमा’ची फुले

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?