वेळापूर : वारा, विजेच्या कडकडाटासह वेळापुरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. आज सायंकाळी चार ते सहाच्या सुमारास सलग दोन तास वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसातच वेळापूरकरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका, लसीकरणाशिवाय वारक-यांना पंढरीत प्रवेश नको https://t.co/0F3oymkaqy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
या पावसामुळे वेळापूर शहरात बघेल तिकडे पाणीच पाणी झाले होते. मुसळधार पाऊस पडल्याने पालखी मैदान, अर्धनारीनटेश्वर ट्रस्ट, इंग्लिश स्कूल वेळापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले. इंग्लिश स्कूल वेळापूर शाळेच्या पटांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने ते पाणी हायस्कूलच्या खोल्यांमधून घुसून खोल्या जलमय झाल्या. तसेच अर्धनारीनटेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या गाळ्यांच्या पाठीमागील जागेत मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साठले. त्यामुळे परिसरात उभी असलेली वाहने काढणे मुश्कील झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वेळापूरकरांना मूसळधार पावसाने काढले झोडपून, ओढ्याला पुराचे स्वरूप, गावामधील वाहतूक बंद (महादेव जाधव – वेळापूर) #surajyadigital #वेळापूर #rain #सुराज्यडिजिटल #पाऊस #मुसळधार #velapurhttps://t.co/PXx30T30GC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
निमगाव , वेळापूर शेरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसाने वेळापुरातून जाणाऱ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले. ओड्याच्यावरून पाणी वाहून बाजारतळ परिसर जलमय झाला. वेळापूर एसटी त्यांच्या पाठीमागून वेळापूर शहरात जाणारा रोड ओढ्याला पाणी आल्याने बंद पडला. तसेच वेळापूर-बोरगाव रोडवरील पांढरे वस्तीलगत ओढ्याला पाणी आल्याने व रोडच्या वरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली. येथुन वाहन चालकांना ये जा करणे मुश्किल झाले आहे.
अक्कलकोटमध्ये भरदिवसा तरुणाचा निघृण खून; पाच गंभीर जखमी, सहाजणांना अटक
https://t.co/xghJ8VWOID— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे वेळापूर शहर आणि उघडेवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असून हा पाझर तलाव एकच पावसामध्ये ५० ते ६० टक्क्यांपेक्षा जास्त भरेल, अशी अपेक्षा आहे.
विहिरीवरील आरसीसी पावसामुळे खचली, बघता – बघता कार बुडाली, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/mevWWCQT4p
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021