मुंबई : मुंबई शेअर बाजारात अदानी ग्रुपसाठी आज काळा दिवस ठरला. 5 ते 20 टक्क्यांनी त्यांचे शेअर्स कोसळले. त्यामुळे अदानी ग्रुपचे भांडवली बाजारातले मूल्य तब्बल 1 लाख 3 हजार कोटी रुपयांनी कमी झाले. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन विदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली. या तिघांची अदानी ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक आहे. मात्र NSDLने त्यांची खाती गोठवली. त्याचाच फटका अदानी ग्रुपला बसला.
https://twitter.com/Devilwearprada0/status/1404431766601932802?s=20
अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तीन कंपन्यांवर NSDL ने कारवाई करत या कंपन्यांचे खाते गोठवले आहेत. अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तीनही कंपन्यांच्या खातेदारांबाबत पुरेशी माहिती नसल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात कंपनीकडे माहिती मागवण्यात आली होती. ही माहिती देण्यास कंपनीने टाळाटाळ केल्यानं या कंपनीवर कारवाई केली आहे.
https://twitter.com/RaviPat63033663/status/1404425284930002945?s=20
शेअर बाजार आज काहीसा निस्तेजपणे सुरु झाला. बाजार मंदपणे सुरु होतानाच अदानी ग्रुप संदर्भात एक चिंता वाढवणारी बातमी आली. त्यानंतर काहीच वेळात बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. अदानी समूहाचे समभाग आज मोठ्या प्रमाणावर कोसळताना दिसले. उद्योगपती गौतम अदानी यांना हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. मुंबई शेअर मार्केट अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आज सोमवारी सकाळी 18 अंकांच्या मुजबुतीसोबत 52,492.34 वर उघडला. परंतू थोड्याच वेळात मार्केटमध्ये (BSE) लाल निशाण दिसू लागले. सकाळी 9.34 च्या दरम्यान सेन्सेक्स 538 अंकांनी घसरुन 51,936.31 वर पोहोचला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, नेशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 8 अंकांनी घसरुन 15,791.40 वर उघडला. सकाळी 9.35 पर्यंत निफ्टी घसरुन 15,606.50 वर पोहोचला. आयटीशिवाय इतरही काही क्षेत्रांमध्ये निर्देशांक धोकादायक वळणावर पोहोचला. मेटल, पावर, रियल्टी, पीएसयू बँक अशा काही कंपन्यांच्या समभागांमध्ये 2% ते 3% घसरण पाहायला मिळाली.
नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (NSDL) ने तीन विदेशी गुंतवणुकदारांच्या अकाऊंटवर निर्बंध लावले. या गुंतवणुकदारांचा अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 43,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1404406511099473921?s=20
प्राप्त माहितीनुसार, अदानी एंटरप्रायजेस शेअर 15% घसरुन 1361.25 रुपयांवर पोहोचला. अदानी पोर्ड्स अँड इकॉनॉमिक जोन शअर 14%, अदानी पॉवर 5% अदानी ट्रान्समिशन 5%, अदानी ग्रीन एनर्जी%, अडानी टोटल गैस 5% घसरले.
* पत्रकार सुचेता दलालने केले होते भाष्य
अनेकांनी ‘हर्षद मेहता स्कॅम’ ही वेब सिरिज पाहिली असेल. हर्षद मेहताचा सगळा घोटाळा उघडकीस आणणारी महिला पत्रकार सुचेता तुम्हाला आठवते का? त्याच सुचेता दलाल यांनी आता दुसऱ्या घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं. त्यांनी 12 जूनला एक ट्वीट करत या संदर्भात हिंट दिली होती…
आणखी एक घोटाळा असा आहे जो उघडकीस येणं कठीण आहे. सेबीकडील ट्रॅकिंग यंत्रणेकडं असलेल्या माहितीच्या बाहेर हे सर्व आहे. एका समुहामध्ये मोठा फेरफार सुरु आहे. यासाठी परदेशी कंपन्यांना हाताशी धरलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य असून अजुनही काहीच बदललेलं नाही.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1404099172194607105?s=20