पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे यांची आज पुण्यात बैठक पार पडली. बैठकीनंतर उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘समाजाचा उद्रेक झाला तर आम्ही काही करू शकणार नाही. तसेच, लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा. माझ्यापासून सुरुवात करा. मला प्रश्न विचारा, असं उदयनराजे म्हणाले आहेत. दरम्यान, या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
16 जूनपासून आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याचंही संभाजीराजेंनी जाहीर केलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती भेटले.
पुणे : खासदार उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भेटीनंतर दोघांची पत्रकार परिषद #surajyadigital #meet #सुराज्यडिजिटल #उदयनराजे #संभाजीराजेhttps://t.co/Hvrj5it6Ms
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
पुण्यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभालू करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. आम्ही पूर्वीपासून एकमतानं काम करत आलो आहोत,” असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.
छ. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच सोलापुरातील मराठा समाजाचं आंदोलन; दोन संघटना, मात्र एक निर्णय
https://t.co/Hmair0edR8— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संभाजीराजेंनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे, सध्याचे राजकारणी देशाची फाळणी करण्याच्या विचारात आहेत,’ असा आरोप यावेळी उदयनराजेंनी केला आहे,’राजकारण्यांची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही, यातून लोकांचा मोठा उद्रेक झाला तर त्यांना कुणीही थांबवू शकणार नाही,’ असंही यावेळी उदयनराजेंनी म्हटलंय.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौरा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी संभाजीराजेंनी चर्चा केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट
https://t.co/TmkZ3BPuRz— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
“आम्ही दोघं एकाच घराण्यातील आहोत. दोन घराण्यांचा संबंध नाही. संभाजीराजे यांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे,” असं उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान यावेळी त्यांनी देशाची पुन्हा फाळणी करायची की नाही याचा विचारा करावा सांगताना आजचे राज्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी राज्याबद्दल बोलत असून केंद्राला पण लागू होतं. प्रत्येक राज्याला लागू होतं असंही ते म्हणाले. जीआर काढून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी यावेळी त्यांनी केल.
काळा दिवस ! आज काही क्षणात अदानी ग्रुपचे करोडो रुपये बुडाले, पत्रकार सुचेता दलालने केले होते भाष्यhttps://t.co/hzgypRQROQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
“आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,” अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.