नवी दिल्ली : भारत सरकारने चीनला आणखी एक झटका दिला आहे. चिनी कलर टीव्हीच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणं आणि इतर देशांकडून कलर टीव्हीच्या आयातीला प्रोत्साहन देणं हे या मागचे उद्दीष्ट आहे.
डीजीएफटीने यासंदर्भात एक अधिसूचना काढली आहे. कलर टेलिव्हिजनसाठी आयात धोरण बदलले गेले आहे. आता मुक्त आयात करता येणार नाही. त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एखाद्या वस्तूवर निर्बंध घातल्यानंतर तो माल आयात करणार्याला परदेश व्यापार महासंचालक (डीजीएफटी) चा परवाना घ्यावा लागेल. डीजीएफटी हे वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येते. भारतात सर्वाधिक टीव्ही सेट्स हे चीनमधून आयात केले जातात. सरकारच्या या निर्णयाने चीनला मोठा झटका बसणं निश्चित आहे.
सरकारने चीनच्या टिकटॉक, हॅलो, यूसी ब्राउझर अशा ५९ मोबाइल अॅपवर बंदी घातली. यानंतर चीनने या अॅप्सचे क्लोन करून ते वेगळ्यान नावाने लाँच केले गेले. त्यावरही भारताने बंदी घातली आहे. या अॅप्सचे कोट्यवधी भारतीय युजर्स होते. या अॅप बंदीमुळे चीनला मोठा झटका बसला आहे आणि कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचं कबूलही केलं आहे. यासोबत चिनी कंपन्यांसोबतचे अनेक करार रद्द करण्यात आले आहेत.