सोलापूर : पंढरपूरच्या सोमनाथ माळी या तरुणाची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. भारतातील एकूण दहा संशोधकांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी सोमनाथ हा एक आहे. त्याचे वडील शेतमजुरी करतात. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही सोमनाथने यश मिळवले आहे. तसेच सोमनाथ हा शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव तरुण आहे.
घरची आर्थिक परिस्थिती नसतानाही शेतमजुराच्या मुलाने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. पंढरपूर येथील सोमनाथ नंदू माळी या तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण केले.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बोलता – बोलता केले गावरान भाषेत अनेक आरोप #surajyadigital #Barshi #सुराज्यडिजिटल #आरोप #बार्शी #MLA #rajendraraut #राजेंद्र #राऊतhttps://t.co/nHm0GLn0hk
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
पंढरपूरच्या सोमनाथ माळी या तरुणाची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. भारतातील एकूण दहा संशोधकांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी सोमनाथ माळी याचाही समावेश आहे. सोमनाथ माळी हा शास्रज्ञ म्हणून निवड झालेला महाराष्ट्रातील एकमेव तरुण आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराबाई स्पेस सेंटर येथे सोमनाथ माळी याची वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोमनाथ याची घरची परिस्थिती खूपच हालाकीची आहे आई-वडिल शेतमजूर म्हणून काम करतात आणि अशा परिस्थितीतही सोमनाथ याने घवघवीत यश मिळवल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. सोमनाथचे आई-वडील हे दुसऱ्यांच्या शेतात जावून मोलमजुरी करतात.
साबरमती नदीतील सर्व नमुने कोरोना बाधित https://t.co/eqZgB9MXE0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
एमटेकपर्यंतचं शिक्षक पूर्ण केल्यावर सोमनाथ याने इन्फोसेसमध्ये नोकरी स्वीकारली. तेथे त्याला विमान इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सोमनाथने इस्रोमध्ये जाण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये अर्ज केला. अखेर सोमनाथची 2 जून रोजी इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली.
एक विवाह असा ही! मनमाडमध्ये किन्नरसोबत विवाह; तरुणाचा आदर्श सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख https://t.co/f1w7XHlrbJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
* अशी सोमनाथची इच्छा
भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांनी जेथून आपल्या कामास सुरुवात केली होती. त्याच इस्रोमध्ये थेट वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्यानंतर आता सोमनाथलाही त्यांच्याच तोडीस तोड काम करायचे आहे. त्यासाठी तो इस्रोच्या भविष्यातील विशेष मोहीमा असणाऱ्या चांद्रयान 3, भारतीय अंतराळ स्थानक, पुनर्निर्मितीक्षम अवकाश यान या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळावी अशी सोमनाथची इच्छा आहे.
शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ #shalu #शालू #surajyadigital #shortdress #सुराज्यडिजिटल #डॉन्स #dance pic.twitter.com/TZECjTxHsI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021