मुंबई : राज्यात राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजप शिवसेना जवळ येत असल्याच्या बातम्या येत असून आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. पवारांच्या अचानक या दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपशी जुळवून घ्या; शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत याची प्रतिक्रिया #political #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Shivsena #शिवसेना #Letterbomb #लेटरबॉम्बhttps://t.co/BQVl5kf4eD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपुर्वी फडणवीस यांनी पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेतली. या भेटीत “सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. याआधी बराच काळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे पंतप्रधनांसोबत आमची व्यक्तिगत भेट झाली. या भेटीत वावगं काहीच नाही.” असं म्हणत आमचे संबंध चांगले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते.
शिवसेना नेत्याचा लेटरबॉम्ब; तुटण्याआधी भाजपशी जुळवून घेण्याचे आवाहन https://t.co/iIDYRWAct6
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान शरद पवार यांच्या भेटीनंतर आता शरद पवार दिल्लीत गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत. शरद पवार यांच्या काही नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याचे म्हटलं जात आहे. केरळच्या नेत्यांची भेट होणार असल्याचेही समजले आहे. परंतु निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट आणि मोदी-ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाल्यामुळे अनेक नेत्यांच्या नजरा शरद पवार नक्की कोणती भूमिका आणि कोणाच्या भेटी घेतायत याकडे लागले आहे.
सोलापुरात मराठा आरक्षणासाठी 4 जुलै रोजी उग्र मोर्चा काढणारच – नरेंद्र पाटील https://t.co/n4AiXCHfEI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वबळाचा नारा सुरु आहे.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकणार आणि पुढेही सोबत काम करणार असं म्हटलं आहे. तसेच शिवसेना विश्वासू पक्ष असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही विश्वास आहे. असं सांगताना शरद पवार यांनी बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द पाळला असल्याची आठवणही करुन दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत निवडणूक लढवेल असेही शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या दिवशी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. प्रशांत किशोर शरद पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर आले होते. यावेळी शरद पवार यांनी राजकीय आणि देशपातळीवरील राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. भाजपविरोधात मोट बांधण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात https://t.co/Tm4NMrRVry
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
* कुणाचीही पालखी वाहणार नाही
उद्धव ठाकरे यांनी मोदींची भेट घेतली. या भेटीत “सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. याआधी बराच काळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे पंतप्रधनांसोबत आमची व्यक्तिगत भेट झाली. या भेटीत वावगं काहीच नाही.” असं म्हणत आमचे संबंध चांगले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान कालच 19 जूनला शिवसेनेचा 55 व्वा वर्धापन दिन पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला होता.
विशेष बाब म्हणजे या संपुर्ण लाईव्ह कार्यक्रमात एरवी हे सरकार 5 वर्ष टिकेल असं म्हणणारे उद्धव ठाकरे “आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
17 वर्षीय शेफालीने केली 50 वर्षापूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी https://t.co/4W4GMnedBH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021