नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा आज तिसरा दिवस आहे. टीम इंडिया 217 धावांवर ऑल आऊट झाली आहे. कुठलाही भारतीय फलंदाज 50 चा स्कोर करु शकला नाही. उपकर्णधार अजिंक्य राहणे याने 49 धावा केल याशिवाय कर्णधार कोहलीने 44 धावा केल्या. तर कीवी टीमकडून काइल जेमिसन ने 5, बोल्ट आणि वेगनरने 2-2 आणि सौदीने 1 विकेट घेतली.
शरद पवारांबाबत मोठी बातमी, दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण https://t.co/BrqFvXXnVa
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये भारताने पहिल्या डावात सर्व बाद 217 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कायले जेमिन्सनने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावा केल्या.
मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात https://t.co/Tm4NMrRVry
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
दुसऱ्या दिवशी आज भारताने 3 बाद 146 धावा पर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी डावाची सुरुवात केली. विराट कोहली 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत देखील 4 धावांवर माघारी परतला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे चांगल्या लयीमध्ये दिसत होता. त्याचे अर्धशतक 1 धावाने हुकले. रहाणेच्या जागी आलेल्या आर अश्विनने वेगाने धावा केल्या. तो 27 चेंडूत 22 धावा करून बाद झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर : कोरोना आजाराला कंटाळून महिलेने रुग्णालयातच घेतला गळफास https://t.co/z8HyWnu8wX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
अश्विनच्या जागी आलेला इशांत चार धावांवर बाद झाला. इशांत बाद झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर काइलने जसप्रीत बुमराहला शून्यावर बाद केले. काइलला हॅटट्रिक घेण्याची संधी होती. पण मोहम्मद शमीने हॅटट्रिक चेंडूवर चौकार मारला. ट्रेंट बोल्टने रविंद्र जडेजाला 15 धावांवर बाद करत भारताचा पहिला डाव 217 धावात संपुष्ठात आणला.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंड कडून कॉनवे (10) आणि लॅथम (12) मैदानावर खेळत असून संघाच्या धावा 22 झाल्या आहेत.