हैदराबाद : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच तेलंगणा सरकारने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. राज्यात आजपासून (20 जून) कोणतेच निर्बंध नसतील असं सरकारने आदेशात जाहीर केलं. दरम्यान, नागरिकांना मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळावे लागतील.
शरद पवारांबाबत मोठी बातमी, दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण https://t.co/BrqFvXXnVa
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्याने अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्य़ा लाटेचा धोका पाहता अजूनही काही भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेलंगणा सरकारने राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या आदेशात आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, असे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ही बाब स्पष्ट केली असून तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईत दहा पिस्तुलांसह 21 वर्षांचा तरुण पोलिसांच्या जाळ्यात https://t.co/Tm4NMrRVry
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेलंगणा राज्याचे आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानंतर लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवस, दररोज करा योग, व्हा सुंदर आणि तंदुरुस्त #सुराज्यडिजिटल #surajyadigital #तंदुरुस्त #yoga #yogaday #internationalyogaday2021 pic.twitter.com/VqgcMe2FrD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
कोरोना रुग्णांच्या संख्या घट होत आहे. त्याचबरोबर कोरोना नियंत्रणात आल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. तेलंगणात 24 तासात 1 हजार 417 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 6 लाख 10 हजार 834 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा एकूण 3 हजार 546 वर पोहोचला आहे.
राहुलजींना पीएम करणार, देशात काँग्रेसशिवाय पर्याय नाही म्हणूनच स्वबळाचा नारा… – नाना पटोले #Congress #CongressParty #surajyadigital #काँग्रेस #स्वबळ #नारा #काँग्रेस #सुराज्यडिजिटल #पीएम #राहुलगांधी #PMhttps://t.co/JN1cdMVD44
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
अनलॉक केले असले तरी सर्व राज्यांना नियमवालीचे पालन करणे आवाश्यक आहे. मास्क लावणे, अंतर पाळणे आणि लसीकरण व तपासण्या सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अनलॉक संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनलॉक करताना किंवा निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकारांनी काळजी घेण्याची गरज आह, असे या पत्रामध्ये गृह सचिवांनी नमूद केलं आहे.
निर्जला एकादशी, विठूमाऊलीच्या नामघोषाने पंढरी दुमदुमली
पंढरपूर : लॉकडाऊनच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अवघी पंढरी आज विठूमाऊलीच्या नामघोषाने दुमदुमली…कोरोनामुळे अवघी पंढरी सुनीसुनी झाली होती. (बजरंग नागणे) #surajyadigital #pandharpur #पंढरपूर #सुराज्यडिजिटल #LockDown pic.twitter.com/wvtCFaWJa1— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021