नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनी उद्या (मंगळवारी) विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला १५ पक्षांचे नेते सामील होणार आहेत. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या दुपारी ४ वाजता पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406636816560623616?s=19
या बैठकीला १५ पक्षांचे नेते सामील होणार आहेत. या बैठकीत राष्ट्रमंच या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406837489034141701?s=19
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच आता शरद पवारांनी उद्या विरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक बोलावल्याचं वृत्त आहे. उद्या मंगळवारी दुपारी ४ वाजता पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला १५ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत राष्ट्रमंचच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406935533222174722?s=19
भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी यूपीएच्या बॅनरखाली एकत्र येण्याऐवजी नवं बॅनर घेऊन एकत्र येण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. यूपीए फेल गेल्याने राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र आल्यास भाजपला धक्का देणं सोपं जाईल. या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत असल्याने राष्ट्रमंच नावानं नवी आघाडी उघडण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतं.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406925554293514240?s=19
दरम्यान, दिल्लीत शरद पवारांच्या ६ जनपथ निवासस्थानी विरोधकांची उद्या मोठी बैठक होत आहे. उद्या उद्या संध्याकाळी चार वाजता ही बैठक होत आहे. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमुल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा, आरजेडीचे मनोज सिन्हा, आप’चे संजय सिंह आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406872120286535680?s=19
संयुक्त पुरोगामी आघाडीची धुरा सोनिया गांधींकडून शरद पवारांकडे देण्यात यावी अशीही चर्चा रंगू लागली आहे. भाजपविरोधात देशव्यापी आघाडी करण्यासाठी शरद पवार आग्रही आहेत. त्यांची आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये झालेली चर्चा ही त्याचाच एक भाग असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या विरोधकांची दिल्लीत सर्वात मोठी बैठक होत आहे. या बैठकीत रणनिती आखण्यावर चर्चा होऊ शकते.
* राष्ट्रपती निवडणुकीसाठी पवारांची दिल्लीवारी
२०२२ मधील राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने पवारांची दिल्लीवारी महत्वाची मानली जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लहान-मोठ्या पक्षांना एकत्रित करून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांनी केला होता. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय घडामोडीना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२२ च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी तयारी आतापासूनच विरोधकांनी सुरु केल्याचे चित्र यानिमित्याने निर्माण झाले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406848590379507714?s=19