मुंबई : चिल्लर जमा करून रुपया करता येत नाही, असा टोला भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला. शरद पवार यांनी आयोजित केलेल्या विरोधकांच्या बैठकीवर निंबाळकरांनी हल्लाबोल केला. बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहीए, अशी परिस्थिती आहे या पक्षांची. या पक्षांचे अस्तित्व संपले आहे ते आता एकत्र येत आहेत. असे अनेक अयशस्वी प्रयोग झाले आहेत. मोडीत निघालेल्या पक्षांना पवार एकत्र करत आहेत, असेही ते म्हणाले.
संपत्तीच्या वादातून शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची प्रकृती बिघडली; आयसीयूत दाखल https://t.co/jWPJT8V7dc
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021
भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. काल पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून ते इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती आखत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नवी दिल्ली येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कार्यकारिणीच्या सदस्यांसोबत पक्षाच्या आगामी ध्येयधोरणांबाबत विस्तृत चर्चा झाली.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 22, 2021
दरम्यान पवारांच्या या खेळीवर भाजपने आता टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या विरोधकांच्या बैठकीवर हल्लाबोल केला आहे. ‘चिल्लर जमा करून रुपया करता येत नाही,’ अशा शब्दात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार निंबाळकरांनी दिल्लीतल्या बैठकीवरून टोला लगावला आहे.
* बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहीए
शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रमंचच्या बॅनरखाली विविध पक्षाचे नेते, पत्रकार, राजकीय विश्लेषक, गीतकार अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांची बैठक बोलावली आहे. त्यावरुन भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर आज देशात कुणाची पात्रता नाही. बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहीए, अशी परिस्थिती आहे या पक्षांची.
ऑनलाईन शॉपिंगच्या मोठ्या डिस्काऊंटवर सरकारची बंदी?; फ्लॅश सेल होणार बंद https://t.co/NpAmvCvz78
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021
या सर्व पक्षांचे अस्तित्व संपलं आहे ते आता एकत्र येत आहेत. असे अनेक अयशस्वी प्रयोग झाले आहेत. मोडीत निघालेल्या पक्षांना पवार एकत्र करत आहेत.’ असा टोला त्यांनी लगावला आहे. शरद पवारांनी बोलावलेल्या या बैठकीला या बैठकीला दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये ओमर अब्दुल्ला, यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे सुशिल गुप्ता, आरएलडीचे जयंत चौधरी, सपा कडून घनश्याम तिवारी, जावेद अख्तर, पवन वर्मा, के सी सिंग, माजीद मेमन, वंदना चव्हाण, जस्टीस ए पी शाह यांचा समावेश आहे.
विरोधी पक्षाची उद्या सर्वात मोठी बैठक, राष्ट्रमंच नावानं नवी आघाडी, राष्ट्रपती निवडणुकीसाठी पवारांची दिल्लीवारी
https://t.co/ByywQV7hxJ— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021