सोलापूर : ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्यात आलेले राजकीय आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. मागासवर्गीय समितीचा तांत्रिक अहवाल राज्य शासनाने कोर्टामध्ये सादर केला नाही, परिणामी हे आरक्षण रद्द झाले आहे. सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात भाजपाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मंडलनिहाय वीस ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई – पुणेकरांसाठी सुखद बातमी
* मुंबई – पुणे – मुंबई मार्गावर चालणारी अशी नवीन रेल्वे…#मुंबई #pune #surajyadigital #पुणे #mumbai #realway #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/OsrqkwuVGl— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
राज्य सरकार विश्वासघात करून सत्तेवर आले आहे. जनतेबरोबर त्याने अनेक समाजाचा विश्वासघात केला आहे. मराठा समाजाला भाजप सरकारने दिलेले आरक्षण सरकाराला टिकवता आले नाही. तसेच ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलेले आरक्षण देखील सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे. मागासवर्गीय पदोन्नती रद्द हे देखील या सरकारचे अपयश आहे, असे असताना चेंडू मात्र मोदी सरकारकडे टोलवत अपयशाचे खापर केंद्रातील सरकारवर फोडले जात आहे.
जेईई परीक्षा 17 जुलैला होणार तर 14 ऑगस्टपर्यंत निकाल येणार https://t.co/QOkkhK2pFC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्य शासनाच्या धोरणांच्या विरोधात भाजप आता रस्त्यावर उतरणार आहे. 26 जून रोजी राज्यांमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाच्या साठी एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन एकाच वेळी केले जाणार आहे, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 14 मंडल आणि शहरातील सहा मंडल असे एकूण 20 ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन केले जाणारा आहे यामध्ये भाजपाचे आमदार , शहर पदाधिकारी तसेच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे समावेश होणार असल्याचे गोरे यांनी यावेळी सांगितले.
…म्हणून शाहरुख आणि अक्षय कुमार एकत्र काम करत नाहीत https://t.co/UTHGMe0IU4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
या पत्रकार परिषदेत आ. विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी , महापौर श्रीकांचना यन्न्म, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख सरचिटणीस बिजु प्रधाने, रुद्रेश बोरामणी, राम वाकसे उपस्थित होते.
* भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं
सरकारमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही , कोणत्याही मंत्र्यांचे एकमेकाशी पटत नाही, संध्याकाळी एक निर्णय आणि रात्री उशिरा दुसरा निर्णय जाहीर केला जातो. आता तर सरकारमधील घटक पक्षातील असलेले छगन भुजबळ आंदोलन करत रस्त्यावर येण्याची भाषा करण्यापेक्षा पहिला सरकार मधून बाहेर पडावे, असा सल्ला देखील जयकुमार गोरे यांनी भुजबळांना दिला.
धुळ्यासह 5 जिल्ह्यात 19 जुलैला पोटनिवडणूक
https://t.co/PJ2yMaEPeX— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021