सोलापूर : सोलापूर शहरात आज आलेल्या अहवालानुसार शहरात दुर्दैवाने अत्यंत वेगाने कोरोनाग्रस्तांनी पाच हजाराचा टप्पा गाठला आहे. शहरातील 35 हजार 69 व्यक्तींची कोरोना चाचणी झाली आहे. त्यामध्ये 5 हजार 50 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यातील 364 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज शनिवारी आलेल्या अहवालात शहरातील पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे आतापर्यंत 3 हजार 61 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 1 हजार 625 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील प्रभाग 24, पाच व प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आज शनिवारी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 65 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून आतापर्यंत 3 हजार 61 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 1 हजार 625 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सोलापुरात 36 वर्षीय महिलेसह आज पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामध्ये दक्षिण कसबा परिसरातील देशमुख गल्लीतील 36 वर्षीय महिलेचा, कर्णिक नगरातील 75 वर्षीय पुरुषाचा, मुलतानी बेकरीजवळील आंबेडकर नगरातील 65 वर्षीय पुरुषाचा, बाळे परिसरातील संतोष नगरात राहणाऱ्या 75 वर्षीय पुरुषाचा आणि शास्त्री नगरातील 62 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आता शहरातील मृतांची संख्या 364 झाली आहे.