साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आज न्यूझीलंडने भारताला धक्का देत विजय मिळवला. आज सहाव्या दिवशी भारताने न्यूझीलंडसमोर १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याच्या प्रत्त्युत्तरादाखल खेळतांना न्यूझीलंडने ८ गडी राखत विजय मिळवला. दुसऱ्या इनिंगमध्ये न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने सर्वाधिक ५२ धावा केल्या. तर रोस टेलरने ४७ धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले.
भारतीय संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघाला चांगलेच झुंजवले. पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. भारताने न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने न्यूझीलंडच्या सलामीवीरांना झटपट बाद केले होते. पण त्यानंतर केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
WTC फायनल : क्रिकेटच्या मैदानातील सर्वात सुंदर फोटो https://t.co/TXO9gKo9j0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
भारतीय संघाने सहाव्या दिवशी २ बाद ६४ या धावसंख्येवरुन सुरुवात केली. भारताला फायनलच्या आजच्या महत्वाच्या दिवशी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण भारताला पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या रुपात मोठे धक्के बसले. त्यामुळे भारतीय संघाला डाव आता गडगडणार असे वाटत होते. पण त्यावेळी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या संघाच्या मदतीला धावून आले. कारण या दोघांनी पहिल्या सत्राच्या अखेरीस आक्रमक फलंदाजी करत चांगल्या धावा जमवल्या. ही जोडी आता भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, असे वाटत होते.
A round of applause to #TeamIndia for their incredible journey to the #WTC21 Final. 👏 👏
Congratulations to New Zealand for winning the World Test Championship. 👍👍
Scorecard 👉 https://t.co/CmrtWscFua pic.twitter.com/iveB9RTUDa
— BCCI (@BCCI) June 23, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा https://t.co/1vHpEjEuTI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
दुसऱ्या सत्रात पंत आणि जडेजाकडून संघाला फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण या दोघांनीही यावेळी भारतीय चाहत्यांचा अपेक्षा भंग केला. कारण दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यावर काही वेळातच पहिल्यांदा रवींद्र जडेजा (१६) बाद झाला. जडेजा बाद झाल्यावर संघाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर आली होती. पण पंत यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसला. पंतने यावेळी चार चौकारांच्या जोरावर ४१ धावांची खेळी साकारली. भारताच्या डावातील ही सर्वाधिक धावांची खेळी ठरली. पंत बाद झाल्यावर भारताचा डाव काही वेळातच १७० धावांत संपुष्टात आला. यावेळी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने सर्वाधिक चार विकेट्स पटकावले. साऊथीला यावेळी ट्रेंट बोल्टने तीन विकेट्स घेत चांगली साथ दिली.
World Test Championship Final Photos.#WTC #WTC21final #WTC2021 #WTCFinal21 #worldtestchampionshipfinal #viratkholi #KaneWilliamson #RohitSharma #RishabhPant #TeamIndia pic.twitter.com/L4ePzTGc5r
— Oneindia News (@Oneindia) June 24, 2021
भारताने यावेळी न्यूझीलंडपुढे विजयासाठी १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना आर. अश्विनने बाद केले. यावेळी भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची चांगली संधी होती. पण यावेळी चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरचा २६ धावांवर झेल सोडला आणि त्याला जीवदान दिले. भारताला हा मोठा फटका बसला. कारण त्यानंतर टेलर आणि कर्णधार केन विल्यम्सन या जोडीने दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने या फायनलचे जेतेपद पटकावले.
कोरोना संकटात ऑलिम्पिक, दारू मिळणार नाही, अनेक भागात मादक पेयांवर बंदी #surajyadigital #बंदी #सुराज्यडिजिटल #कोरोना #olympics2021 #अॉलिम्पिक #wine pic.twitter.com/rXYA6JmKcJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
* विराट कोहलीने केला क्रिकेटमधील मोठा विक्रम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने काल एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. आयसीसीच्या स्पर्धेतील फायनल आणि सेमीफायनलमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट अव्वल ठरला आहे. त्याने आतापर्यंत सर्व फायनल आणि सेमीफायनल मिळून त्याने ५३५ धावा केल्या आहेत. ज्या अन्य कोणत्याही फलंदाजापेक्षा अधिक आहेत.
टोकयो ऑलिम्पिक : बेड्सचे फोटो पाहून खेळाडू म्हणाले कंडोम वाटप निरुपयोगी https://t.co/pgzA3BpUS5
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021