नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये आजच्या दिवशी (२५ जून १९७५) आणीबाणी लावली होती जी २१ मार्च १९७७ पर्यंत होती. आणीबाणीचा विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांना त्या काळी अटक करण्यात आली होती. देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणीबाणीला आज ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
This is how Congress trampled over our democratic ethos. We remember all those greats who resisted the Emergency and protected Indian democracy. #DarkDaysOfEmergency https://t.co/PxQwYG5w1w
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
देशात इंदिरा गांधी सरकारच्या काळात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली. आज त्या दिवसाला ४६ वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय.
तत्कालीन काँग्रेस सरकारनं केवळ आपल्या लोकशाही मूल्यांना चिरडलं नाही तर आपल्या महापुरुषांचा ऐतिहासिक वारसादेखील अंधारात ठेवला होता, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या नेत्यांचीही आठवण करून दिली.
The #DarkDaysOfEmergency can never be forgotten. The period from 1975 to 1977 witnessed a systematic destruction of institutions.
Let us pledge to do everything possible to strengthen India’s democratic spirit, and live up to the values enshrined in our Constitution.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
‘अशा पद्धतीनं काँग्रेसनं आपली लोकशाही नीती पायदळी तुडवली. आणीबाणीचा प्रतिकार आणि भारतीय लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या त्या सर्व महान व्यक्तींचं स्मरण करत आहोत’ असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासोबतच, इन्स्टाग्रामवर भाजपद्वारे जारी करण्यात आलेल्या आणीबाणीशी निगडीत स्लाईडस पंतप्रधानांनी शेअर केल्या आहेत. आणीबाणी दरम्यान तत्कालीन काँग्रेस सरकारनं कोणकोणत्या गोष्टींवर बंदी घातली होती, हे या स्लाईडमधून भाजपनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तत्कालीन काँग्रेस सरकारच्या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या २५० हुन अधिक पत्रकारांना कारागृहात डांबण्यात आले. राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली गेली, हे भारतीय कधीच विसरणार नाहीत. #DarkDaysOfEmergency https://t.co/wDcAlwSgMr
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) June 25, 2021
‘आणीबाणीचा तो काळा दिवस विसरता येणं शक्य नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही संकल्पना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करू आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करु’ असंही पंतप्रधानांनी ट्विट केलंय.
आणीबाणीच्या २१ महिन्यांच्या काळात काँग्रेस सरकारने ३ लाखांहून अधिक भारतीयांना कुठल्याही चौकशीशिवाय अटक केली होती. आपल्या व्यक्तीस्वातंत्र्यासाठी करावा लागलेला हा संघर्ष भारतीय कधीच विसरणार नाहीत. #DarkDaysOfEmergency https://t.co/gQrFxmoAHD
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) June 25, 2021
भाजपच्या म्हणण्यानुसार, १९७५ ते १९७७ दरम्यान अर्थात आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद देशभक्त चंद्रशेखर आझाद, भगत सिंह यांच्यावर तयार करण्यात आलेल्या सिनेमांवरही काँग्रेसकडून बंदी घालण्यात आली होती. याशिवाय किशोर कुमार यांचे गाणे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या विचारांच्या प्रसारालाही काँग्रेसकडून बंदी घालण्यात आली होती.
न्यायव्यवस्था आणि राजकीय यंत्रणा यांची परस्परपूरकता आणीबाणीच्या काळात धोक्यात आली आणि त्याचा परिणाम सर्व भारतीयांना भोगावा लागला. आपले पद वाचवण्यासाठी कुटुंबकेंद्रित पक्षात सर्वोच्चस्थानी असणारी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते याचा हा जिवंत वस्तुपाठ आहे. #DarkDaysOfEmergency pic.twitter.com/7ZWeX4KA53
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) June 25, 2021
२५ जून १९७५ ची ती मध्यरात्र देशासाठी काळरात्र ठरली. तो दिवस देशाला लोकशाहीतून हुकूमशाहीमध्ये घेऊन जाणारा होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी आणीबाणी जाहीर केली आणि राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी ती लागू केली. नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्यासाठी कोणतेही ठोस कारण नव्हते. मात्र, सुरक्षेचे कारण पुढे करण्यात आले होते. १९७५ ते ७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ देशात आणीबाणी होती.
1975 में आज ही के दिन कांग्रेस ने सत्ता के स्वार्थ व अंहकार में देश पर आपातकाल थोपकर विश्व के सबसे बड़े लोकतंत्र की हत्या कर दी। असंख्य सत्याग्रहियों को रातों रात जेल की कालकोठरी में कैदकर प्रेस पर ताले जड़ दिए। नागरिकों के मौलिक अधिकार छीनकर संसद व न्यायालय को मूकदर्शक बना दिया। pic.twitter.com/SvFmEXKYcn
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) June 25, 2021
केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा ट्विटमध्ये म्हटले आहे की, १९७५ च्या या दिवशी काँग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती.
एक परिवार के विरोध में उठने वाले स्वरों को कुचलने के लिए थोपा गया आपातकाल आजाद भारत के इतिहास का एक काला अध्याय है।
21 महीनों तक निर्दयी शासन की क्रूर यातनाएं सहते हुए देश के संविधान व लोकतंत्र की रक्षा के लिए निरंतर संघर्ष करने वाले सभी देशवासियों के त्याग व बलिदान को नमन।
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) June 25, 2021
ते म्हणाले, “असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेस देखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि कोर्टाला निःशब्द प्रेक्षक बनविले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे. २१ महिने निर्दय शासनाचे क्रौर अत्याचार सहन करत देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व देशवासियांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम.”
आणीबाणीबद्दल फडणवीस काय म्हणाले ? #आणीबाणी #emergency #dark #भाजपा #Fadanvis #Politics #surajyadigital #सुराज्यडिजिटल – आणीबाणीबद्दल सुप्रिया ताईंना माहित नाही, आम्ही ती भोगलीय.https://t.co/1apNh1W51v
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
लोकशाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा संपूर्ण देशाने त्याचा मुकाबला केला!#DarkDaysOfEmergency pic.twitter.com/rCcUOYuYrR
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 25, 2021