पुणे : पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांमधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर शनिवार आणि रविवार पूर्णत: बंद राहतील. पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी असेल.
जानकर परिवाराच्या विवाह सोहळ्यास शरद पवार यांची हजेरी, जानकरांच्या दुसर्या पिढीला शरद पवारांचा आशीर्वाद https://t.co/8sDergMPxX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.
महाराष्ट्रातभर पावसाची शक्यता, सोलापुरात जोरदार पाऊस #rain #surajyadigital #पाऊस #solapur #maharashtra #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/gghojsQHa5
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.
सोलापूर : माकपाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शेतीवाचवा, लोकशाही वाचवा, देशवाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी घोषणाबाजीनंतर ताब्यात घेतलं. #surajyadigital #माकप #आंदोलन #सुराज्यडिजिटलhttps://t.co/P4j5zrJKEj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
पुण्यात देखील आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून पुणेकरांना नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बायकोने जरी मारलं तरी मोदींनाच जबाबदार धरतील – फडणवीस, देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात https://t.co/UZD8ht7xje
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
* पुणे शहरात एकूण रुग्णसंख्या पावणे पाच लाखांच्या वर
पुणे शहरात काल नव्याने 258 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 77 हजार 084 इतकी झाली आहे. शहरातील 246 कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 66 हजार 002 झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात 5 हजार 795 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 40 हजार 590 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 522 रुग्णांपैकी 314 रुग्ण गंभीर तर 443 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 560 इतकी झाली आहे.
नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांना ताब्यात घेतले. #surajyadigital #भाजपा #DevendraFadnavis #nagpur #सुराज्यडिजिटल #OBCReservationhttps://t.co/OFdFI1v3gM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
* पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध; काय सुरु काय बंद?
– मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
– उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यातील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
– लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी.
– अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना परवानगी.
रत्नागिरी – राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले https://t.co/ORGQLZ63Ds
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021