जाजपूर : ओडिसामधील जाजपुरमधून एक विचित्रच बातमी आली आहे. येथून एका 27 वर्षांच्या नवरदेवाने लग्नमंडपात एका क्षुल्लक कारणामुळे लग्नासाठी नकार दिला आहे. वऱ्हाड्यांना जेवणात मटण न मिळाल्याने नवरदेव चिडला आणि लग्नातून ताडताड निघून गेला. धक्कादायक म्हणजे त्याच रात्री नवरदेवाने दुसऱ्या तरुणीसोबत लग्नगाठ बांधली.
होंडा आणणार जबरदस्त इलेक्ट्रॉनिक स्कूटर, पहा फिचर्स https://t.co/vIY7xrK6Dw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
नवरदेवदेखील जेवणात मटण नसल्यामुळे नाराज झाला होता. आणि भर मंडपात केवळ मटणासाठी त्याने लग्न करण्यास नकार दिला. यावेळी मुलीकडील मंडळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कोणीही त्यांचं ऐकलं नाही आणि ते गावी निघून गेले. यावेळी नवरदेव जवळ असलेल्या आपल्या नातेवाईकांकडेच थांबला. नवरदेवाने त्याच रात्री नातेवाईकांच्या गावातील एका मुलीशी लग्न केलं. त्यामुळे लग्न तुटलं तरी शेवटी तो नवरी घेऊनच घरी परतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही.
राष्ट्राध्यक्ष जो बायडनच्या खात्यावरुन मुलाने दिले होते कॉलगर्लला १८ लाख, रात्रीची कहाणी कशी आली उघडकीस, कॉलगर्लने परत बोलावलेhttps://t.co/VwCqYkosk9
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
द न्यू इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार, नवरदेवाचं नाव रमाकांत पात्र असल्याचं सांगितलं आहे. त्याचं लग्न सुकिंग येथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत ठरलं होतं. लग्नासाठी जेवणाचीही चांगली तयारी करण्यात आली होती. मात्र मटणाची तेवढी कमी होती. मात्र नेमकी हिच बाब नवरदेवाच्या जिव्हारी लागली. आणि लग्नात मटण नसल्याचं दिसताच त्यानं लग्न करण्यास नकार दिला.
पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध; काय सुरु काय बंद ?, पुणे शहरात एकूण रुग्णसंख्या पावणे पाच लाखांच्या वरhttps://t.co/IsmlHONmXU
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
नवरदेव वाजत-गाजत मुलीकडे पोहोचला. मुलीकडील सदस्यांनाही उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर लग्नाचे विधी सुरू झाले. दरम्यान जेवणात नेमकं मटण नसल्यामुळे वऱ्हाड्यांचा हिरमोड झाला. त्यांनी मुलीकडील नातेवाईकांसमोर आरडा-ओरडा सुरू केला. ही बाब नवरदेवाच्या कानावर पडली. मुलाकडील सदस्यांचं म्हणणं होतं की, लग्नात मटणाची मागणी आधीपासून करण्यात आली होती. ती पूर्ण का केली नाही? मटण का ठेवलं नाही, म्हणून हा सर्व प्रकार घडला.
जानकर परिवाराच्या विवाह सोहळ्यास शरद पवार यांची हजेरी, जानकरांच्या दुसर्या पिढीला शरद पवारांचा आशीर्वाद https://t.co/8sDergMPxX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021