अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील एका कुटुंबात प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा कुटुंबातील तिघांनी मिळून गळा दाबून खून केला. पुतळाबाई शिवराज मलगोंडा (वय ३३ रा हनूर नाका, अक्कलकोट) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना ३० जून सकाळी ११ वाजता निदर्शनास आली. यात पती,दिर व जाऊ यांच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पतीस ताब्यात घेतले आहे.
रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, सुसंस्कार मला शिकवण्याची गरज नाही – आमदार पडळकर #surajyadigital #political #सुराज्यडिजिटल #politics #Solapur #सोलापूरhttps://t.co/ylgPIglVcK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत पुतळाबाई शिवराज मलगोंडा या आपले पती शिवराज सोबत हनूर नाका,अक्कलकोट येथे वास्तव्यास होते. पुतळाबाई यांची सासरी मोठी प्रॉपर्टी असून पती शिवराज मलगोंडा यांना दारू पिण्याची व्यसन असल्याने प्रॉपर्टीचे कामकाज दिर देवराज बसवराज मलगोंडा हे पाहतात. पुतळाबाई सोबत पती शिवराज व दिर देवराज हे प्रॉपर्टीवरून वाद करून पुतळाबाईस त्रास देत होते.चारित्र्यावरुन संशय घेत छळ करत होते.
या विषयी पुतळाबाई या आपल्या माहेरी वागदरी (ता.अक्कलकोट ) येथे आल्यावर आपल्या आई वडिलांना होणाऱ्या त्रासाविषयी सांगायच्या. त्यानंतर पुतळाबाईचे आई वडील सासरच्या लोकांची समजूत काढून जायचे, तरीही सासरचे लोक मयत पुतळाबाईस त्रास द्यायचे. ३० जून रोजी मयत पुतळाबाई मलगोंडा राहत्या घरी बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत असल्याचे शेजारी राहत असलेल्या लोकांनी वडील मल्लिनाथ शेळके यांना फोनद्वारे कळवले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आई वडील भाऊ व गावातील इतर लोक घरी गेले. त्यावेळी पुतळाबाई या बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी मयत पुतळाबाई यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासणी केले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. सदर मयताची खबर वडील मल्लिनाथ आप्पासाहेब शेळके यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली.
सोलापूर : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर आज सायंकाळी ८ वाजता दगडफेक झाली. पडळकरांची प्रतिक्रिया #surajyadigital #Solapur #सुराज्यडिजिटल #दगडफेक #सोलापूर #political #politics #प्रतिक्रिया #पडळकर #भाजपा #MLAhttps://t.co/L8XSlPW8Vu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
मयताचा पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करून डॉक्टरांनी गुदमरून मयत झाल्याचे प्रमाणपत्र दिले. या अगोदर म्हणजे २४ जून रोजी सायंकाळी ७
वाजता मयत पुतळाबाईस पती शिवराज यांने चारित्र्याचा संशय घेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली होती.याबाबत २५ जून रोजी पती शिवराज दिर देवराज व जाऊ गंगोत्री मलगोंडा यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्याच दिवशी पुतळाबाई माहेरी गेले होते. २८ रोजी सासरी निघून आल्या.
३० जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास मयत पुतळाबाई शिवराज मलगोंडा (वय ३३) यांचे सासरी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी असून याबाबत सतत वाद चालू होते. पती शिवराज दिर देवराज व जाऊ गंगोत्री हे सर्वजण मयत पुतळाबाईस तुला प्रॉपर्टी वाटून देणार नाही, असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत वेळोवेळी लथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली होती.
आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक, पडळकरांची प्रतिक्रिया https://t.co/cySM7ghF1V
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
३० रोजी मयत पुतळाबाई मलगोंडा यांना वरील संशयित आरोपी पती दिर व जाऊ यांनी मिळून नाकातोंडावर उशी सारख्या वस्तूने दाबून तिला ठार मारले आहे. म्हणून पती शिवराज बसवराज मलगोंडा रा हनूर नाका अक्कलकोट, दिर देवराज बसवराज मलगोंडा व जाऊ गंगोत्री देवराज मलगोंडा दोघे (रा फत्तेसिंग मैदान बाजूला अक्कलकोट ) यांच्या विरुद्ध बसवराज मल्लिनाथ शेळके (वय ३६ रा वागदरी) यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा निदर्शनास येताच पती शिवराज बसवराज मलगोंडा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.
शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मला संस्कार शिकवण्याची गरज नाही
https://t.co/g7ULJteTBV— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021