कराड : आळंदीवरुन पंढरपुरला पायी वारीने जाण्यासाठी निघालेल्या व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, कीर्तनकार बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी पुण्याच्या तापकीर वाडीतून ताब्यात घेतलं होते. त्यांना आज कराडच्या करवडी येथील त्यांच्या गोपालन केंद्रात पोलिसांनी आज शनिवारी आणून स्थानबद्ध केले आहे.
सविनय पद्धतीने आंदोलन करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांना अटक करणं हा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे. वारकऱ्यांच्या असंतोषाला महाविकास आघाडी सरकारला सामोरं जाव लागेल! pic.twitter.com/kmaVtnKGcg
— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) July 3, 2021
पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी आज पहाटे त्यांना ताब्यात घेत वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. यावर बंडातात्यांनी वारकरी संप्रदायाचे चाकोरीबद्ध चाललेले आंदोलन पोलिसांनी मोडीत काढले असून ज्ञानेश्वर, तुकारामांच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला.
कोरोना नियमांचे पालन करून वारीला निघालेले ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर आणि काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत केलेली कारवाई निषेधार्ह आहे. तुमच्या या कृत्याला वारकरी संप्रदाय कधीही माफ करणार नाही. मविआ सरकारने आपली ही जुलूमशाही आता बंद करावी! pic.twitter.com/kMZNyBay2p
— Prasad Lad (Modi ka Parivar) (@PrasadLadInd) July 3, 2021
पायी वारी साठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. मात्र करुणा महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली.
त्यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात काही वारकरी कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी किंवा देहू येथे गर्दी करू नये, तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले होते. आळंदी आणि देहू येथे निर्बंध लागू केले असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या सोलापुरातील वारक-यांना पोलिसांनी दिवेघाटात अडवले. पहा काय झाले #आळंदी #वारकरी #दिवेघाट #pandharpur #सुराज्यडिजिटल #surajyadigital pic.twitter.com/atEXc4WCGw
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021
दरम्यान, सध्या राज्यातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच अनेक धार्मिक सण उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना सावटात पार पडणार आहेत. आषाढी वारीसाठीही सरकारच्या वतीनं नियमावली जारी करण्यात आली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसनं पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे.
समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे बंडातात्या कराडकर यांनी आळंदी येथे जाहीर केले होते. त्यानुसार, आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले.
मला मुख्यमंत्री करा – संभाजीराजे, समाजाला रस्त्यावर आणून, त्यांना वेठीस धरू नका https://t.co/Yig5hGVslV
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021
सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तेथे पोहोचले, त्यावेळी पोलिसांनी त्यांनाही दिगी येथील संकल्प मंगल कार्यालयात ताब्यात घेतले. त्यानंतर बंडातात्या यांना पुणे पोलिसांनी कराड तालुक्यातील करवडी येथील त्यांच्या गोपालन केंद्रात आणून कराड पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बंडातात्या म्हणाले, पोलिसांनी घेतलेला निर्णय हा त्यांचे वरिष्ठांचे आदेश देतात, त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली आहे.
सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार https://t.co/vHWh7IX3Hk
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021