मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर या निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे धाव घेतली आहे. सरकारने केलेल्या कारवाईचा आणि आरोपांचा अहवाल मागवा, अशी मागणी या आमदारांनी राज्यपालांकडे केली. कायदेशीर प्रक्रिया तपासून उचित निर्णय घेऊ, असं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.
निलंबित केलेल्या आम्ही १२ आमदारांनी मा. महामहीम @maha_governor @BSKoshyari जी यांची राजभवनात जाऊन भेट घेऊन लोकशाही विरोधी काम करणाऱ्या ठाकरे सरकारची लेखी तक्रार दिली! pic.twitter.com/wjAcireark
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 5, 2021
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून झालेल्या गोंधळामुळे भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान याप्रकरणी भाजप आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासंबंधी तडकाफडकी बैठक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात झाली. या 12 आमदारांनी आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ब्रेकिंग : शेलार, महाजनांसह भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन, 1 वर्ष बंदी, विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या- तालिका अध्यक्षhttps://t.co/lAxCb44TrX
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 5, 2021
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांचे निलंबनावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी हे सरकार तालिबानी सरकार असल्याची टीका केली आहे. निलंबित आमदार आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन एक वर्षासाठी निलंबित झालेले भाजपचे आमदार नेमकी काय मागणी करणार आणि राज्यपाल त्यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होते. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चांगलंच रण पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक समाजघटकाची फसवणूक करत आहे. ही फसवणूक आम्ही उघड पाडू या भितीतूनच खोटे आरोप रचून आमच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ही लोकशाहीची गळचेपी असून या निलंबनाचा मी निषेध करतो.जनतेच्या हितासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करतच राहू! pic.twitter.com/3xsuS630GU
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 5, 2021
सध्या भाजपचे निलंबित आमदार हे विधानसभेच्या उपाध्यक्ष यांच्या दालनात जावून निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी भाजपकडून केली. या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.