मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज भाजपच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच अभिरुप विधानसभा भरवली आहे. तसेच या ठिकाणी भाजपचे आमदार बोलत आहेत. त्यांनी त्यांचा अध्यक्षही निवडला आहे. या मुद्यावरून सभागृहात सत्ताधारी पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. तसेच हे तत्काळ थांबवले जावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
विरोधकांनी पायऱ्यावर भरवली अभिरुप विधानसभा, विधीमंडळ परिसरात प्रचंड गोंधळ, विरोधकांना पायऱ्यांवरुन हटवले #political #surajyadigital #सुराज्यडिजिटल #भाजपा pic.twitter.com/txjjTqw4WL
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली होती. कालीदास कोळमकर यांना या विधानसभेचं अध्यक्ष करण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी भाजपच्या आमदारांनी माईक घेऊन भाषण देण्यास सुरुवात केली होती.
* विधीमंडळ परिसरात प्रचंड गोंधळ, विरोधकांना पायऱ्यांवरुन हटवले
मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गोंधळ विधीमंडळ परिसरात पाहायला मिळत आहे. भाजपने आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. तसेच विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच त्यांनी अभिरुप विधानसभा भरवली. यानंतर अध्यक्षांच्या आदेशानुसार भाजपच्या सर्व आमदारांना पायऱ्यांवरुन हटवण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठी बैठक; 22 नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार https://t.co/3IDCbVkmFX
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021