Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

“श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही”

Surajya Digital
Last updated: 2020/08/02 at 5:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नाशिक : श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिकच्या सिडको परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करताना आव्हाड यांनी  प्रभू श्रीरामाची पूजा केली.

“कोरोनामुक्त महाराष्ट्र घडो, हीच श्रीराम चरणी प्रार्थना” अशी मनोकामना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. “प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा. लहानपणापासून काळाराम मंदिर माझ्या तोंडपाठ” असे आव्हाड यांनी आवर्जून सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“गेली 40 वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. रामाचे नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या, सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं” असा घणाघातही आव्हाडांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला सोलापूर दौऱ्यात दिला होता. “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असं ते म्हणाले होते.

“श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्या मनात प्रामाणिकपणा, मर्यादा आहे, त्याच्यामध्ये राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो. त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत, त्याचं एवढं काही नाही. त्यांना वाटतंय ते करत आहेत”
– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंञी

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #जितेंद्रआव्हाड #नाशिकठाकरे #कोविडरुग्णालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदींचे राम मंदिरासाठी योगदान नसून राजीव गांधींचे योगदान; भाजपा ज्येष्ठ नेत्याचे विधान
Next Article सुखद वार्ता : 130 जणांनी केली कोरोनावर मात, एक मृत्यू तर 54 रूग्णांची भर; 3 हजाराहून अधिक कोरोनामुक्त

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?