Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रक्षकच बनले भक्षक, सोलापुरात लाचखोर पीआय पवारसह एपीआय खंडागळे अटकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

रक्षकच बनले भक्षक, सोलापुरात लाचखोर पीआय पवारसह एपीआय खंडागळे अटकेत

Surajya Digital
Last updated: 2021/07/10 at 9:53 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : एका गुन्ह्याचे प्रकरण मिटविण्यासाठी साडेसात लाख रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला मदत करतो म्हणून तब्बल साडेसात लाखांची लाच मागणाऱ्या सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना काल शुक्रवारी (ता.९) सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

मोहोळ : समाजकल्याणच्या संगणक प्रशिक्षण योजनेत मोठा आर्थिक घोटाळा https://t.co/m6D5fHHJIC

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021

शेतातून विनापरवाना मुरूम उचलल्याप्रकरणी एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरुन सलगर वस्ती पोलिस ठाणे अंतर्गत अवैध मुरूम उपसा प्रकरणात गुन्हा दाखल होता. संबंधित आरोपीला या गुन्ह्यात मदत करतो म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार व त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी साडेसात लाखाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने एवढ्या मोठ्या लाचेची मागणी केल्याने घाबरला. रक्कम मोठी असल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काल शुक्रवारी (ता. ९) रात्री साडेसातच्या सुमारास जुना पुना नाका याठिकाणी लाच घेताना अँटी करप्शन विभागाने धाड टाकली. दोन पोलिस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

डफरीन हॉस्पिटलमध्ये ऑनड्युटी डॉक्टर बाहेर, उपायुक्तांनी बजावली नोटीस  https://t.co/WCOU6m1CJf

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुना पुना नाका येथे एपीआय खंडागळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. धक्कादायक म्हणजे एपीआय रोहन खंडागळे याची कारवाई दिवशी म्हणजे शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी होती, अशीही माहिती समोर येत आहे. तक्रारदाराकडून खंडागळे याने एकाचवेळी साडेसात लाख रुपयांची रक्कम घेतली. या वेळी त्याला लाचलुचपत विभागाने पकडल्याची माहितीही या विभागाने रंगेहाथ पकडले.

सोलापुरात 12 जुलैनंतर लहान मुलांना मोफत निमोनिया प्रतिबंधक लस
https://t.co/afeCK4jRWu

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021

या गुन्ह्यामध्ये आणखी कोण-कोण सामील आहेत का, याचा तपास त्याच्या कॉल रेकॉर्डिंगवरून लाचलुचपत विभागाचे अधिकारी घेत आहेत. त्याचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली.

अकोला शहराजवळ भीषण अपघात; चौघे ठार https://t.co/t0W5vNZU1C

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #API #Khandagale #arrested #Solapur #corrupt #PI #Pawar, #रक्षक #भक्षक #सोलापुरात #लाचखोर #पीआय #एपीआय #खंडागळे #अटकेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळ : समाजकल्याणच्या संगणक प्रशिक्षण योजनेत मोठा आर्थिक घोटाळा
Next Article “काका-पुतण्याच्या” ताटाखालचे मांजर कोण, आम्ही? ओबीसी काँग्रेस नेते भडकले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?