सोलापूर : काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काँग्रेस सध्या काका-पुतण्याच्या (शरद पवार आणि अजित पवार ) ताटाखालचे मांजर झाल्याचा आरोप होत असल्याचे निदर्शनास आणले. यावर ओबीसी नेते भानुदास माळी हे चांगलेच भडकले.
रक्षकच बनले भक्षक, सोलापुरात लाचखोर पीआय पवारसह एपीआय खंडागळे अटकेत, साडेसात लाखांची लाच https://t.co/g9sOHGOkvZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
तसेच भारत देश आरक्षणमुक्त करण्याचा आरएसएस व भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केला. मात्र आपण त्यांचा डाव साध्य होऊ देणार नाही. काँग्रेस मात्र भाजपमुक्त भारत करणार असल्याचे म्हटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी हे आज शनिवारी (ता.१० जुलै) सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यांनी काँग्रेस भवनात शहर जिल्हा ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आरक्षण मुक्त भारत करण्याचा डाव आरएसएस व भाजपचा असल्याचे सांगत केंद्र सरकारने जर ओबीसीचा इम्पेरियल डेटा जो आमचा आहे, तो येत्या तीन महिन्यात सादर करावा,अन्यथा महाराष्ट्रातून 1 लाख ओबीसी समाज दिल्लीत आंदोलन करेल असा इशारा माळी यांनी दिला.
आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजप, संघाचा डाव, परत दिला स्वबळाचा नारा #congress #surajyadigital #OBC #सुराज्यडिजिटल #ओबीसी #काँग्रेस
– सोलापूर काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी दौ-यावर आहेत. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना https://t.co/Hi2NfENaxR— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, सुशील बंदपट्टे, विजय हत्तुरे, अलका राठोड, अंबादास गुत्तीकोंडा हे प्रमुख नेते उपस्थित होते.