बीड : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडसाद बीडमध्ये उमटू लागले आहेत. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. समर्थकांनी राजीनाम्यांचे अस्त्र उगारले आहे. बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे.
"काका-पुतण्याच्या" ताटाखालचे मांजर कोण, आम्ही? ओबीसी काँग्रेस नेते भडकले
https://t.co/3JwFMilEtn— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरूच आहे. आज दिवसभरात पदाधिकारी आणि कार्यकर्ते असे एकूण 25 जणांनी राजीनामे दिले आहेत. यात बीड जिल्ह्यातील सात तालुका भाजप अध्यक्षांचा समावेश आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे त्यांनी आपले राजीनामे सादर केले.
आरक्षणमुक्त भारत करण्याचा भाजप, संघाचा डाव, परत दिला स्वबळाचा नारा #congress #surajyadigital #OBC #सुराज्यडिजिटल #ओबीसी #काँग्रेस
– सोलापूर काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी दौ-यावर आहेत. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना https://t.co/Hi2NfENaxR— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपात नाराजीचे पडसाद उमटले आहेत. बीडमधील 14 भाजपा पदाधिकारी आणि 11 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने मुंडे समर्थकांत कमालीची नाराजी आहे. पंकजा मुंडे यांनी काल जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय पटलेला असल्याचे सांगत नाराज नसल्याचं म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंकजा मुंडे भावूक, नाराज नसल्याचे स्पष्टीकरण; भागवत कराडांचा आला होता फोन
https://t.co/IVhdFvbanM— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
* ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा
भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने भाजपातील मोठा गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. परंतु मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मुंडे यांना मंत्री नाही केले तर काय झाले. ताई साहेब, आमच्या मनात आताही मंत्री आहेत. पक्ष काय इशारा देतो हे सांगायची गरज नाही राहिली. आता तरी ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा, असा संदेश सोशल मीडियातून कार्यकर्त्यांनी पसरविला आहे. त्यात आता राजीनामा सत्राची भर पडली.
अभिनेते चंकी पांडे यांना मातृशोक https://t.co/FbqPzL3lH9
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
* स्वकीयांच्याच कारस्थानांमुळे मुंडे भगिनींना डावलण्याचा प्रकार
४० विधानसभा मतदारसंघांत माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे भगिनींचा प्रभाव आहे. पक्षातील वरिष्ठांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना साथ द्यायला हवी; परंतु साथ न देता त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न चालू आहे. ताईंनी वेगळी भूमिका घ्यावी यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत, असे भाजपा कार्यकर्ता सचिन गीत्ते यांनी सांगितले. जनतेतून विक्रमी मताने निवडून येणाऱ्या नेत्यास डावलल्यामुळे जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली. हाच वसा पुढे चालवत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा व खा. प्रीतम मुंडे यांनी पक्षाला सत्तेवर बसवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, आता काही स्वकीयांच्याच कारस्थानांमुळे मुंडे भगिनींना डावलण्याचा हा प्रकार आहे. यामुळे भाजपाचेच नुकसान होणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
जुलैत होणाऱ्या पोटनिवडणुका पुढे ढकलल्या https://t.co/Kel6NzBJqs
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021