नवी दिल्ली : जगाला पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या संकटापासून जगाला वाचवण्याची जबाबदारी चीनने घेतली आहे. ऐकून आश्चर्य वाटेल. कोरोना विषाणू फैलावून देशात हाहाकार माजावला आहे. अमेरिकेने थेट चीनवर आरोप केले आहेत. असा चीन मदतीसाठी कसा धावून येणार, असे वाटत असेल, मात्र हे खरे आहे. वाचा विस्तृतपणे.
https://twitter.com/careblais/status/1414213635241480195?s=19
चीन पृथ्वीला आर्मागेडॉनपासून वाचवणार आहे. त्यासाठी चीन या लघुग्रहावर सर्वात मोठ्या रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करणार आहे. त्यामुळे याची दिशा बदलणार आहे. पृथ्वीच्या दिशेने एक मोठा लघुग्रह येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय. असे झाल्यास पृथ्वीवरील सजीवसृष्टी मोठ्या प्रमाणात नष्ट होऊ शकते. मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते.
आपल्या पृथ्वीवर अंतराळातून लघुग्रह, उल्कापिंडांच्या रूपात अनेकदा संकटं येत असतात. दरम्यान, आता पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या अशा संकटापासून जगाला वाचवण्याची जबाबदारी चीनने घेतली आहे. चीन पृथ्वीला आर्मागेडॉनपासून वाचवणार आहे. त्यासाठी चीन पृथ्वीवर येणाऱ्या या लघुग्रहावर त्यांच्याकडे असलेल्या सर्वात मोठ्या रॉकेटच्या माध्यमातून हल्ला करणार आहे. त्यामुळे या लघुग्रहाची दिशा बदलणार आहे. त्यासाठी चीन विशेष योजना आखत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/k_neabs/status/1414022842350505989?s=19
चीन ज्या लघुग्रहावर हल्ला करण्याची योजना आखत आहे त्याचे नाव बेन्नू असे आहे. हा लघुग्रह ७७५० कोटी किलोग्रॅम वजनाचा आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. एवढेच नाही तर हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जरी गेला तरी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कारण त्याची गती आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जी ऊर्जा निर्माण होईल ती पृथ्वीसाठी विनाशकारी ठरू शकते.
ॲस्ट्रॉइड बेन्नू हा पृथ्वीच्या कक्षेमध्ये सन २१७५ ते २१९९ यादरम्यान येण्याची शक्यता आहे. म्हणजेच ही घटना १५४ ते १७८ वर्षांदरम्यान होण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता फारच अल्प आहे. मात्र तज्ज्ञ कुठल्याही प्रकारचा धोका स्वीकारण्यास तयार नाही आहेत. हा लघुग्रह अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या आकाराचा आहे. एवढा मोठा लघुग्रह समुद्रात जरी पडला तरी त्याच्या वजनाने येणाऱ्या समुद्राच्या लाटेने संपूर्ण जगात विद्ध्वंस होऊ शकतो.