अमरावती : बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
गंगाधर राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने राणा कुटुंबातील सर्व सदस्य, तसेच कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणाची कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी एप्रिल महिन्यात दौरे केले होते. नवनीत कौर राणाही यामध्ये सहभागी होत्या. एप्रिल महिन्यात रवी राणा यांना 103 -104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या होत्या. तेव्हा त्यांना खासगी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती.
“अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजे”
– नवनीत राणा, खासदार