मुंबई : माजी दिग्गज क्रिकेटर आणि १९८३ चे विश्व विजेत्या भारतीय संघाचे सदस्य राहिलेले यशपाल शर्मा यांचे आज मंगळवारी निधन झाले आहे. हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६६ वर्षांचे होते. शर्मा यांनी भारतासाठी ३७ टेस्ट मॅचमध्ये १ हजार ६०६ रन केले. तसेच, वनडेमध्ये त्यांनी ४२ मॅचमध्ये २८.४८ च्या अॅवरेजने ८८३ रन केले.या घटनेने क्रिकेट जगतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Semi final match against England in 1983 World Cup pic.twitter.com/DcIz8cLxjk
— Yashpal Sharma (@cricyashpal) June 25, 2021
मीडिया रिपोर्टनुसार यशपाल शर्मा मॉर्निंग वॉकवर बाहेर गेले होते. मॉर्निंग वॉकवरून परत आल्यानंतर त्याने आपल्या प्रकृतीला बरे वाटत असल्याचे सांगितले. हे कुटुंब तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी सकाळी ७.४० वाजता त्याचा मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यशपाल हे कपिल देव यांच्या नेतृत्वात १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. क्रिकेट विश्वकपच्या विजयात त्यांनी माेलाची कामगिरी केली होती. यशपाल हे १९८३ विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारे दुसरे खेळाडू होते. त्यांनी ३७ एकदिवसीय आणि ४२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते १९७९-८३ दरम्यान भारताच्या मध्यम फळीचा एक महत्त्वाचा हिस्सा होता.
Yashpal Sharma, India's second-highest run-getter at the 1983 World Cup, has passed away at the age of 66.
He played 37 Tests and 42 ODIs for India.
May he rest in peace. pic.twitter.com/MLZ3Nm5vcg
— Wisden India (@WisdenIndia) July 13, 2021
यशपाल यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कपिल देव यांना देखील आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूची बातमी ऐकून गहिवरून आले.
‘ मला अजूनही या घटनेवर विश्वास बसत नाही. मला काहीच सुचेनासे झाले आहे. मागील महिन्यातच आम्ही दोघे भेटलो होतो. यशपाल यांचा स्वभाव खूप चांगला होता. पण शेवटी परमेश्वराची इच्छा. त्याच्यासोबती लढाई कधी जिंकू शकत नाही. फक्त इतकेच परमेश्वराला सांगेन की असे करू नकोस.
Hero of 1983's WC winning squad & an explosive batsman!
Remembering the incredible career & contribution of the lion hearted Yashpal Sharma! pic.twitter.com/qHv8cWPXbw
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 13, 2021
वाईट वाटत आहे. मी स्वतःला सावरू शकत नाही. मी मुंबई मध्ये आहे. सध्य दिल्लीला जात आहे. बस्स इतकेच सांगेन की, लव्ह यू यश….
अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर यशपाल यांच्या आणि क्रिकेटच्या चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले जात आहे.
Shri Yashpal Sharma Ji was a much beloved member of the Indian cricket team, including the legendary 1983 squad. He was an inspiration for teammates, fans as well as budding cricketers. Anguished by his passing away. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनीही सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
Shocked to hear about the passing of cricketer Yashpal Sharma. His energy & marvellous contribution in the 1983 World Cup will be remembered by all.
My heartfelt condolences to his family and fans.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) July 13, 2021
* यशपाल शर्मा यांचे करिअर
– यशपाल शर्माने भारताकडून एकूण ३७ कसोटी सामने खेळले. त्याने ३४ च्या सरासरीने १६०६ धावा केल्या.
– यशपाल शर्माने भारताकडून एकूण ४२ एकदिवसीय सामने खेळले. त्याने ८८३ धावा केल्या. तथापि, १९८३ च्या विश्वचषकानंतर यशपाल शर्माची कारकीर्द प्रगती होऊ शकली नाही.
– यशपाल शर्माला खराब कामगिरीमुळे कसोटी संघात दुसरी संधी मिळाली नाही. त्याला वनडे संघातूनही वगळण्यात आले.