सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी ग्रामीण भागात 131 नवे रुग्ण आढळून आले तर चार जणांचा मृत्यू झाला. तर 94 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
ग्रामीणची एकूण रुग्णसंख्या चार हजारांच्या घरात म्हणजे 3 हजार 943 झाली आहे तर मृतांची संख्या 112 झाली आहे. करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी 23 रूग्ण सापडले. मृतांमध्ये वैराग (ता. बार्शी), सुभाष नगर (बार्शी), नान्नज (ता. उत्तर सोलापूर), समर्थ चौक (अक्कलकोट) येथील व्यक्तींचा समावेश आहे. मृतांची संख्या 112 झाली आहे.
* तालुकानिहाय रूग्ण संख्या
अक्कलकोट 481 बार्शी 817, करमाळा 154, माढा 257 माळशिरस 242, मंगळवेढा 119, मोहोळ 279, उत्तर सोलापूर 307 पंढरपूर 560, सांगोला 117, दक्षिण सोलापूर 610.