मुंबई : राज्यात उद्या (१६ जुलै) दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे. www.mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1415605267417374723?s=19
राज्यातील दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता मुलांना ऑनलाईन आपला निकाल पाहता येईल. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे. कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळणार? हे मात्र उद्या निकाल जाहीर झाल्यावर कळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली.
इयत्ता १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी राज्य सरकारनं इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इयत्ता १० वीच्या निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. यासाठी १० जून रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार आयोजित करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून इयत्ता १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या शुक्रवारी, दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीनं इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1415610193375731714?s=19
– दहावीचा निकाल ‘असा’ लावला जाईल
* www.mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल
* विद्यार्थ्यांचे १० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – ३० गुण
* विद्यार्थ्यांचे १० वीचे गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – २० गुण
* विद्यार्थ्याचा ९ वीचा विषयनिहाय अंतिम निकाल – ५० गुण
https://twitter.com/thakur_shivangi/status/1415607278787391497?s=19