सोलापूर : आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरात एसटी, खाजगी बससेवा 17 ते 25 जुलैपर्यंत येण्यास आणि जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
सोलापूर : फडकुले सभागृहात होणार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा https://t.co/mEyuHUeD6P
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार पंढरपूर शहरामध्ये 19 ते 24 जुलै 2021 या कालावधीमध्ये आषाढी वारी होत आहे. वारीसाठी किंवा पादुकांच्या दर्शनासाठी भाविक एसटीने किंवा खाजगी बसने येण्याची शक्यता आहे. भाविक मोठ्या प्रमाणावर आले तर पंढरपूर शहरात कोविड 19 चा संसर्ग वाढून मानवी जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे एसटी आणि खाजगी बस सेवेवर बंदी घालण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उद्या दहावीचा निकाल, येथे पाहा, शिक्षणमंत्र्यांचा ट्वीट व्हिडिओ पहा https://t.co/HQAKeO8lob
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या गावातून भाविक/नागरिकांना वारीसाठी, पादुकांचे दर्शनासाठी, श्री विठ्ठल मंदिर परिसरात दर्शनासाठी आणि चंद्रभागेमध्ये स्नानासाठी मनाई करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि गोपाळपूरसाठी 18 जुलैच्या सकाळी 6 वाजलेपासून ते 24 जुलैच्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत, शहरातील नगरप्रदक्षिणाचे आतील बाजूस, सर्व घाट, वाळवंट परिसर, मंदिर परिसर 18 जुलैच्या सकाळी 6 वाजलेपासून ते 25 जुलै 2021 च्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत 18 जुलैच्या सकाळी 6 वाजलेपासून ते 22 जुलैच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मनाई आदेश राहणार आहेत.
राज्यातील या बँकेचा परवाना रद्द, बुधवारपासून व्यवसाय बंद https://t.co/zWpY3cDv73
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
* यांना राहणार सवलत
हे आदेश अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, मंदिर समिती पासधारक किंवा परवानाधारक व्यक्ती, कर्तव्यावर असणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, वारीसाठी शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या पालख्या व सोहळे, जीवनाश्यक वस्तू व सेवा यांना लागू राहणार नाहीत. यांना यातून सवलत राहणार आहे.
आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था अथवा संघटना यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्याने बनवली सौरऊर्जेवर चालणारी सायकल, 1.50 रुपयांत 50 किमी धावणार https://t.co/1R4TIbSFWN
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021