Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत सरकारने आयपीएल दिली परवानगी; चिनी प्रायोजक विव्होमुळे #BoycottIPL या हॅशटॅग ट्रेंडिंगमधून नाराजी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळदेश - विदेश

भारत सरकारने आयपीएल दिली परवानगी; चिनी प्रायोजक विव्होमुळे #BoycottIPL या हॅशटॅग ट्रेंडिंगमधून नाराजी

Surajya Digital
Last updated: 2020/08/03 at 10:00 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई / नवी दिल्ली : क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामन्यांवरही बंदी आहे. मात्र, भारत सरकारने आता आयपीएलला परवानगी दिली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. इतकंच नाही तर आयपीएल सामन्यांचं शेड्युलही तयार झालं आहे. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत यूएईमध्ये खेळवला जाणार आहे.

त्याशिवाय, महिलांचा आयपीएलही खेळवला जाणार आहे, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. आयपीएलचे सर्व स्पॉन्सर्स अबाधित आहेत, म्हणजे चिनी प्रायोजक विव्हो आयपीएलचे मुख्य स्पॉन्सर म्हणून कायम राहतील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे. आयपीएल 53 दिवस चालणार आहे. आयपीएलची फायनल 10 नोव्हेंबरला खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, यावेळी आपीएलमध्ये 10 डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत.

‘आयपीएलचे सामने सायंकाळी साडे सात वाजेपासून खेळवले जाणार आहेत. आम्ही आयपीएलच्या नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटं आधी सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. जे सामने आधी सायंकाळी 8 वाजता घेतले जात होते, ते सायंकाळी साडे सात वाजता खेळवले जाणार आहेत’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

स्पर्धेच्या मुख्य स्पॉन्सर म्हणून VIVO या चिनी कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीसीआयने VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा, अशी लोकांची भूमिका होती. सोशल मीडियावर यासाठी दबावही वाढवण्यात आला होता.

सुरुवातीला जनमताचा आदर करत बीसीसीआयने यावर विचार करण्याची तयारी दाखवली. परंतू करोनामुळे सध्या निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात सध्याच्या घडीला VIVO कंपनीची स्पॉन्सरशीप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. VIVO आणि बीसीसीआय यांच्यात 5 वर्षांचा करार झाला असून प्रत्येक वर्षासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून 400 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. बीसीसीआयच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून ट्विटरवर #BoycottIPL हा हॅशटॅग ट्रेंडिंग करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

TAGGED: #भारतसरकार #आयपीएलपरवानगी #बायकॉटआयपीएल #चिनीप्रायोजक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पासह मुलीस कोरोनाची लागण; ट्वीट करुन दिली माहिती
Next Article कोरोना बाधित शोधण्यासाठी या देशात ‘लॅब्रेडॉर’ व ‘गोल्डन रिट्राइव्हर्स’ची घेणार मदत

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?