मोहोळ : नगरपरिषदेच्या राजकीय द्वेषातून कट रचून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संगनमताने डबलसीट दुचाकीस्वारावर पाठीमागून टेम्पो घालून शिवसैनिकाचा खून केल्याची घटना काल बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळ घडली.
उद्या दहावीचा निकाल, येथे पाहा, शिक्षणमंत्र्यांचा ट्वीट व्हिडिओ पहा https://t.co/HQAKeO8lob
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
सतीश नारायण क्षीरसागर (रा. सिद्धार्थ नगर मोहोळ) असे खून झालेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. तर विजय सरवदे असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या संतोष जनार्दन सुरवसे , रोहित उर्फ अण्णा अनिल फडतरे , पिंटू जनार्दन सुरवसे व भैय्या उर्फ बिरमल खेलू असवले अश्या चार जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर भैय्या असवले याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत दादाराव नारायण क्षीरसागर याने मोहोळ पोलिसात फिर्यादी दिली. त्यानुसार फिर्यादीचा भाऊ सतीश नारायण क्षीरसागर हा शहरात शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते . गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक आठ व नऊ मध्ये बोगस मतदार नोंदणी केलेबाबत तक्रार केली होते तर रमाई घरकुल आवास योजनेच्या फाईल गायब झाल्याच्या संदर्भात आवाज उठवून २८ जून २०२१ रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी हे असले आंदोलन का केले ..? तुझी फाईल मीच गडप केली आहे जा तुला काय करायचे आहे ते कर अशी धमकी दिली होती.
राज्यातील या बँकेचा परवाना रद्द, बुधवारपासून व्यवसाय बंद https://t.co/zWpY3cDv73
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्षाचे पती संतोष सुरवसे व वहिनी नगरसेविका असणारे रोहित उर्फ अण्णा फडतरे व त्यांचे साथीदार सतीश वर चिडून होते. याच कारणावरुन आरोपींनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी गावठी रिवाल्वरने पायात फायरिंग करून तुम्हाला खल्लास करण्यात येईल, असे धमकावले होते. तरीही सतीश क्षीरसागर याने अन्य कार्यकर्त्यांसमवेत आंदोलने केली होती.
आषाढीवारी : पंढरपूर शहरात एसटी, खाजगी वाहतूक राहणार बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश जारीhttps://t.co/Cxe1n5mqOc
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
दरम्यान काल बुधवार दि. १४ जुलै रोजी भैय्या असवले , संतोष जनार्दन सुरवसे , रोहित उर्फ अण्णा फडतरे , पिंटू जनार्दन सुरवसे व अन्य एक यांनी एकत्रितपणे येऊन कट रचून सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोघांना जेवन करण्यासाठी बोलावले होते. जेवन करुन ते दोघे या एम एच १३ सी पी ०६८७ दुचाकीने घरी परतत असताना भैय्या असवले याने त्याचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच १३ ए एक्स ४९०८ ने पाठीमागून वेगात आणून त्यांच्या दुचाकीवर घातला.
या घटनेत सतीश क्षीरसागर जागीच ठार तर विजय सरवदे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान आम्ही सर्व नातेवाइकांनी सतीश चा अपघात नसून घातपात झाल्याचा आरोप करत मोहोळ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दबावाखाली – प्रवीण दरेकर
आषाढीवारीसह राष्ट्रवादीवर केले आरोप https://t.co/lCKgFCba4Q— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी भेट दिली, घटनेचा सखोल तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल पाच तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास संमती दर्शविली. याप्रकरणी मृताचा भाऊ दादाराव नारायण क्षीरसागर याने मोहोळ पोलिसात फिर्याद दिल्याने चार जणांच्या विरोधात खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर हे करीत आहेत. या घटनेमुळे मोहोळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ #surajyadigital #पीकविमा #सुराज्यडिजिटल #PMKisan #cropinsurance
– अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार योजनेत सहभागासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. pic.twitter.com/dA225gyG34— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021