मुंबई / नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. त्यांच्यात जवळपास 1 तास विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. या भेटीमुळे राज्यातील राजकारणात मोठा बदल होईल, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीत हजेरी लावली होती.
मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये गेले. या चर्चेतील तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. नुकते अमित शहांकडे सहकारमंत्री गेल्याने पवारांनी यावर भाष्य केले होते. त्यामुळे सहकार आणि बँकिंग क्षेत्राबद्दल प्रामुख्यानं चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
Met the Hon. Prime Minister of our country Shri Narendra Modi. Had a discussion on various issues of national interest.@PMOIndia pic.twitter.com/AOp0wpXR8F
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
चर्चा चालू असतानाच शरद पवार यांनी ट्विट करत भेटीसंर्भात माहिती दिली आहे. शरद पवार यांनी भेटीचा फोटो ट्विट केला आहे. पवार यांनी मोदींची भेट घेतलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चर्चा केली असल्याचे कॅप्शनमध्ये पवारांनी नमूद केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होण्यापूर्वी शरद पवार आणि मोदी यांची भेट झाली होती. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान कार्यालयात होणाऱ्या भेटीगाठींमध्ये प्रशासकीय स्वरुपाच्या चर्चा होतात असा एक संकेत आहे. त्यामुळे या बैठकीत सहकार आणि बँकिंग क्षेत्रावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी केंद्राकडून सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. या खात्याची जबाबदारी अमित शहांकडे सोपवण्यात आली. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीची मोठी ताकद म्हणजे प्राणच आहे. ही पार्श्वभूमी पाहता याबद्दल आजच्या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग – शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या चर्चा #Modi #Pawar #Yediyurappa #चर्चा #surajyadigital #political #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/W1L3eJ25Ib
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021
राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी निवड झालेले पियूष गोयल यांनी कालच पवारांची भेट घेतली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील पवारांची भेट घेत त्यांना लडाखमधील चीनच्या हालचाली आणि भारताची स्थिती याबद्दल माहिती दिली. त्यामुळे संसदेत चीन आणि शेतकरी आंदोलनाचा मुद्दा फारसा चर्चिला जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे.
स्मार्टसिटीमुळे सोलापूरची स्वप्नपूर्ती; स्मार्ट सिटी विभागात दररोज एक – दीड तास पाणीपुरवठा https://t.co/HBtCJhMjc4
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021
गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक पवारदेखील त्यांच्यासोबत होते. या तिन्ही नेत्यांनी मोदींची भेट घेतली. यानंतर मोदी आणि ठाकरेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली होती. यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थेट संवाद झाला. आता मोदी आणि पवारांची भेट झाली आहे.
* कर्नाटकचे मुख्यमंत्री राजीनामा देणार ?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे राजीनामा देणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. येडियुरप्पा यांनी नवी दिल्लीत हजेरी लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. वाढते वय आणि आजारपण यामुळे येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त समोर येत आहे. सध्या येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत.