मुंबई / सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत येत्या सोमवारी (ता. 19 जुलै ) राज्यातील 10 मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बस सज्ज झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान, थेट एसटीच्या अधिकृत फेसबुक पेजवर…
फेसबुक पेज लिंक ⬇️https://t.co/N56NU5OnoA
.
.#msrtc#msrtcofficial pic.twitter.com/eXkNhWFCz8— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) July 17, 2021
वारकऱ्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या असून मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटी महामंडळाला मिळाल्याबद्दल अनिल परब यांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्मार्टसिटीमुळे सोलापूरची स्वप्नपूर्ती; स्मार्ट सिटी विभागात दररोज एक – दीड तास पाणीपुरवठा https://t.co/HBtCJhMjc4
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021
गेल्या आषाढीलाही बसमधूनच पालख्यांचे प्रस्थान झाले होते. मात्र बसचे भाडे देण्यावरुन विसंवाद झाला होता. वारक-यांकडून पैशाची मागणी केली होती. विषय खूपच वाढल्याने सोलापुरातील एका भाजप नेत्याने जिल्हाधिका-यांना पैशाचा चेक दिला होता. त्यामुळे खूपच चर्चा झाली होती. महाविकास आघाडी सरकारवर टीकाही झाली होती.
आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपुरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे.
भीमा – सीनेच्या पात्रात बंधारे निर्मितीसाठी आराखडा करा – जलसंपदामंत्री; भंडारकवठेसह 10 गावांना पुराचा धोका, बंधारा दुरूस्ती करा
https://t.co/UMpADwpHg0— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021
आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. या पालखी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने मोफत शिवशाही बस दिल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर शहर व गोपाळपूर वगळता भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी आदी गावांमध्ये मात्र 18 ते 22 जुलैपर्यंत संचारबंदी राहणार आहे. सुरुवातीला एक दिवस आणि नंतर दोन दिवस असे एकूण तीन दिवस या गावांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे.
पंढरपूरकडे 19 जुलै रोजी या बसेस पालख्यांसोबत रवाना होतील. त्यासाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे 10 पालख्यांसाठी 20 शिवशाही बसेस सज्ज झाल्या आहेत. या बसेस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहेत. पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास शिवशाही बसमधून होणार आहे.
त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जातील. वारकरी संप्रदायांचा हा प्रवास सुखकर होण्यासाठी शिवशाहीचे चालक योग्य ती खबरदारी घेतील, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, पवारांनी ट्वीटद्वारे दिली माहिती, सहकार आणि बँकिंग क्षेत्राबद्दल चर्चा ?https://t.co/KGu1oLfyww
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021