Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धक्कादायक ! वारी बंदोबस्तातील पाच पोलिसांसह होमगार्डला कोरोनाची लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

धक्कादायक ! वारी बंदोबस्तातील पाच पोलिसांसह होमगार्डला कोरोनाची लागण

Surajya Digital
Last updated: 2021/07/19 at 9:11 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

पंढरपूर / सोलापूर : कोरोनामुळे मोजक्याच वारक-यांना आणि मानाच्या दहा पालख्यांना पंढरपुरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे पंढरपूरला तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. काल रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा प्रथम उपाय म्हणून या बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

कोरोना वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक निर्बंध लावून दिले आहे. यामुळे मोजक्याच नागरिकांना व दिंड्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात येत आहे. परवानगीशिवाय कोणीही पंढरपुरात येऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास तीन हजार पोलिसांना येथे तैनात करण्यात आले आहे. दोन दिवसांत तीन हजार पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. रविवारी आलेल्या अहवालात पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सोलापूरआषाढी वारीसाठी बंदोबस्ताला आलेल्या सर्व पोलिसांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दोन दिवस चाललेल्या चाचण्यांमध्ये पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना विलगीकरण कक्षात ठेवले असल्याचे अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी ही तपासणी करण्यात येत असल्याचेही सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* भाविकांविना माऊली वाखरी पालखी तळावर विसावले

कानड्या विठुरायाची आषाढी एकादशी उद्या मंगळवारी आहे. माञ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याञा सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजणेच्या सुमारास भाविकांविना संत ज्ञानेश्वर माऊली वाखरी पालखी तळावर विसावले. यात्रा सोहळ्यातील शेवटचा मुक्काम वाखरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या प्रमुख संतासह अन्य संताच्या पालख्यांचा असतो. यामुळे प्रत्येकवर्षी लाखो भाविकांची गर्दी या पालखी तळावर असते.

मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी विसावली. यावेळी प्रशासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल‌ बेल्हेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, माधवी निगडे आदी उपस्थित होते.

* वारकरी ठाम, चर्चा सुरु

वाखरीपासून ईसबावी विसावापर्यंत शासनाने पायी चालत जाण्यास परवानगी दिली आहे. मात्र विसावापासून पंढरपुर पर्यंत एका पालखीसोबत दोनच व्यक्तींनी चालत जाण्यास परवानगी दिली आहे. माञ पंढरपुर पर्यंत सर्वच लोकांना पायी चालत जाणेस परवानगी देण्यात यावी अन्यथा वाखरी मधून पालखी जाणार नाही असा पविञा घेतला आहे.

* उद्या शासकीय महापूजा

उद्याच्या शासकीय महापूजेनंतर मंदिर समितीने केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानंतर संत कान्होपात्राचे झाड म्हणून ओळख असलेले तरटीचे झाड वयोमानाने वाळले आहे. त्या ठिकाणी नवे तरटीचे रोपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

महापूजेसाठी मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी दाम्पत्य, मंदिर समितीचे सहअध्यक्ष, पालकमंत्री यांनाच गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सुरवातीला गाभाऱ्यात मंदिराचे पुजारी असतील. त्यावेळी मंदिरातील चारखांबीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांचे कुटुंबीय, मानाचे वारकरी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष यांची उपस्थिती असेल. तर सोळखांबीत मंदिर समितीचे 14 सदस्य, सल्लागार समितीचे नऊ सदस्य, विभागीय आयुक्‍त, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रांताधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Homeguard #infected #coronaalong #five #policemen #Wari #Bandobast, #वारी #बंदोबस्तातील #पाचपोलिसांसह #होमगार्डला #कोरोनाची #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत वकिलावर तलवारीने हल्ला तर उस्मानाबादेत डॉक्टराचा वकिलावर हल्ला
Next Article तोडगा निघाला, 30 वारकऱ्यांना पालखीसोबत पायी जाण्यास परवानगी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?