Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उजनीत ८ हजार ४०० क्युसेक्सने पाणी येण्यास सुरुवात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

उजनीत ८ हजार ४०० क्युसेक्सने पाणी येण्यास सुरुवात

Surajya Digital
Last updated: 2021/07/21 at 9:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यात व भीमा खो-यासह उजनी धरण पाणलोट क्षेत्रात ओढ दिलेल्या पावसाने अखेर काल मंगळवारपासून संततधार  पडत असल्याने या पावसामुळे आज बुधवारी (दि. २१ ) सायंकाळी सहा वाजता दौंड येथून ८ हजार ४०० क्युसेक्स विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे.

सध्याची पाणी पातळी  वजा ३.३४ टक्के पाणीसाठा आहे. येत्या  दोन दिवसात उजनी धरण पाणीपातळी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लसमध्ये येण्याची आशा  आहे. गत वर्षी २० जुलै रोजी उजनी धरण मृत साठ्यातून बाहेर आले होते.

आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता दौंड येथून ८ हजार ४०० क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. सध्या पाणी पातळी  वजा ३.३४ टक्के पाणीसाठा आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चालू हंगामात उन्हाळ्यात १३ मे रोजी उजनी धरणाची जिवंत साठ्यातून मृत साठ्याकडे वाटचाल चालू झाली होती. मागील वर्षी देखील उजनी धरण १३ मे रोजी मृत साठ्यात गेले होते.

२ जून पासून गेल्या पन्नास दिवसात उजनी धरणात कमी अधिक पावसामुळे १० टिएमसी पाणीसाठा वाढला आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने २ जूनपासून उजनी पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झाली होती. यावर्षी वजा २२. ४२ टक्के इतका पाणीसाठा खाली गेला होता. तर सध्या एकूण ६१. ८४ टिएमसी पाणीसाठा सून वजा १. ७९ टिएमसी पाणीसाठा आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाची संतधार अशीच सुरू राहिल्यास उजनी धरण दोन दिवसात मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता असून उजनी शंभर टक्के भरण्याची आशा निर्माण झाली आहे. उजणी धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्यापासून २३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

उजनी प्लस होण्याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकदा उजनी प्लस झाली की वर्षभर पाण्याचा प्रश्न मिटतो.  सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची पूर्ण भिस्त या उजनीवर आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतीलाही उजनीचे पाणी आवश्यक असते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #Water #started #flowing #Ujjain #cusecs, #उजनीत #क्युसेक्सने #पाणी #येण्यास #सुरुवात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article ‘आगे बडो, मराठा आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचं नाही’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?