Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या पद्मशाली समाजाच्या प्रीतीचा विदेशात डंका, मिळाली एक कोटीची नोकरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूरच्या पद्मशाली समाजाच्या प्रीतीचा विदेशात डंका, मिळाली एक कोटीची नोकरी

Surajya Digital
Last updated: 2021/07/23 at 1:40 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूरच्या कष्टाळू आणि प्रामाणिक समाज म्हणून ओळख असलेल्या पद्मशाली समाजाच्या कन्येचा विदेशात डंका वाजत आहे. कॅनडा देशातील कंपनीची मोठ्या पगाराच्या एक कोटी रुपयाची नोकरीची संधी मिळाली आहे. ही बाब पूर्वभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

 

प्रीती व्यंकटेश कैरमकोंडा असे त्या युवतीचे नाव आहे. तिने विदेशात एमबीएचे शिक्षण घेतले आहे. कॅनडा या देशाच्या टोरॅंटो शहरातील  ‘केपीएमजी’ या नामवंत कंपनीत नोकरीची संधी मिळाली आहे. तिला वार्षिक एक कोटी रुपये पगाराची ऑफर आहे. तेलंगणातून तेलुगु भाषिक पद्मशाली समाजाने सोलापुरात येऊन मराठी भाषेला आपलं केले आहे. शहरातील पूर्व भागात विविध उद्योग-व्यवसायात नावलौकिक मिळवला. सध्या पद्मशाली समाजातील अनेक युवक शासकीय नोकऱ्यांसह मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

येत्या सप्टेंबरपासून ती या कंपनीत रुजू होणार आहे. ती फार कष्टाळू व अभ्यासू असून तिच्यात उत्कृष्ट संभाषणकला व व्यावसायिक दृष्टिकोन असल्याचे तिचे वडील अभिमानाने सांगतात.

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तिला अरेबिक, फ्रेंच, जर्मनी, मराठी, तेलुगु, हिंदी, इंग्लिश भाषा अवगत असून कॅनेडियन व अमेरिकेची बोलीभाषा उत्तम येते.

प्रीतीचे वडील मुलीविषयी बोलताना म्हणतात, माझी मुलगी प्रीती हिने मोठ्या कष्टाने विदेशात एमबीए केले. ती सप्टेंबरपासून टोरॅंटोमधील केपीएमजी या नामवंत कंपनीत नोकरी करणार आहे. पुढे सीईओ व्हायचे तिचे स्वप्न असल्याचे व्यंकटेश कैरमकोंडा यांनी सांगितले.

 

प्रीतीचे वडील व्यंकटेश कैरमकोंडा हे मूळ सोलापूर आहेत. ते विद्युत अभियंता आहेत. टाटा कन्सल्टिंगमध्ये नोकरी करत असताना त्यांना जपान, अबुधाबी येथे कामाची संधी मिळाली. नंतर त्यांनी रिसर्च करीत एका इलेक्‍ट्रॉनिक उपकरणाचा शोध लावला. आशिया खंडात हे उत्पादन कोणीच बनवत नसल्याने त्यांनी भारतात परतून सोलापुरात फॅक्‍टरी टाकण्याचा संकल्प केला. याकरिता ते सहकुटुंब भारतात परतले. दरम्यान, कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची ऑफर मोठ्या प्रमाणात आल्याने ते सध्या याच कामासाठी मुंबईत स्थायिक आहेत.

 

* प्रीतीविषयी अधिक माहिती

प्रीती हिचा जन्म सोलापुरात झाला. वडिलांच्या नोकरीदरम्यान ती अबुधाबीत चौथीपर्यंत शिकली. नंतर बदलीनंतर टोरॅंटो येथे गेले. प्रीतीचे पुढील शालेय शिक्षण टोरॅंटोत झाले. वडिलांनी नोकरी सोडून मायदेशात परतल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्‍ट्रॉनिक्‍सची पदवी घेतली. त्यानंतर मुंबईत झायकस या विदेशी कंपनीत नोकरी करत असताना तिला अमेरिका, ब्राझील, मेक्‍सिकोमध्ये कंपनीतर्फे कामाची संधी मिळाली.

प्रीतीने टोरॅंटोच्या रोटमॅन बिझनेस स्कूलमध्ये 2019 मध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. नुकतेच तिचे शिक्षण पूर्ण झाले. तिला एका वर्षापूर्वीच कॅनडा देशातील टोरॅंटो शहरात ‘केपीएमजी’ या कंपनीत वार्षिक सुमारे एक कोटी रुपये (वार्षिक दीड लाख कॅनेडियन डॉलर) पगाराच्या नोकरीची ऑफर आली. ती तिने स्वीकारली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #love #Padmashali #community #Solapur #Danka #abroad #got #jobworth #onecrore, #सोलापूर #पद्मशाली #समाजाच्या #प्रीतीचा #विदेशात #डंका #एककोटींची #नोकरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात आढळले डेंग्यूचे हजारांवर रुग्ण, पाचजणांचा मृत्यू; पहा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण
Next Article भारतात लाँच होणार वन प्लस नॉर्ड टू OnePlus Nord 2

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?