सोलापूर : जागा खरेदी देऊन त्यावर बांधकाम करून देण्याचे आमिष दाखवून 37 लाखांची फसवणूक करण्यात आलीय. ही घटना 2014 सालापासून ते आजपर्यंतच्या काळात घडली. यात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तर आणखी एक घटना दुर्दैवी घडलीय. कंबर तलावात एका तरुणाने आत्महत्या केलीय.
37 लाखांच्याषफसवणुकीबाबत संजय कुमार बाबुराव कांबळे (वय 54 रा. रेल्वे बिल्डींग सोलापूर) यांनी फिर्याद दिली त्यावरून स्वप्निल मोहन घोरपडे ( रा. अमरोलीवाला अपार्टमेंट, लष्कर, सोलापूर) व सुहास गुरप्पा हुंबरवाडी, (बेळगाव) विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने संगणमत करून फिर्यादीला जागा तसेच त्यावर बांधकाम करून देण्याचे आमिष दाखविले. त्याच बरोबर दुसरी जागा ही खरेदी देण्याचे मान्य केले. सन 2014 मध्ये संशयित आरोपींनी जागा तसेच बांधकामाकरिता फिर्यादीकडून पैसे घेतले त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीकडून पैसे घेतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हद्दवाढ भागातील सर्वे नंबर 130 पैकी 90 हजार चौ.मी.जागेतील दोन हजार चौ.फूट जागा, तसेच त्यावर बांधकाम करण्याचे कबूल केले होते तसेच प्लॉट नंबर 18 खरेदी देण्याचेही मान्य केले होते. परंतु 37 लाख रुपये संशयित आरोपींनी घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे जागा खरेदी न देता तसेच बांधकाम करून देण्याचे टाळून फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.
* कंबर तलावात तरुणाची आत्महत्या
– कंबर तलावातील पाण्यात आज शुक्रवारी दुपारी तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्या तरुणाची ओळख पटली असून तीन दिवसांपासून तो घरातून निघून गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुकेश कारासिंग सतारवाले ( वय 35, रा. बापूजी नगर, सोलापूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. मुकेश फरशी बसविण्याचे काम करीत होता. तो एक उत्तम कारागीर बुधवार सकाळीच तो घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी पोलिसात नोंद केली होती.
दरम्यान आज शुक्रवारी दुपारी कंबर तलावातील पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. सदर बाजार पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना मृतदेह दाखविला. नातेवाईकांनी तो बेपत्ता मुकेशचा मृतदेह असल्याची खात्री दिली. त्याच्या हातावर गोंदलेले मुकेश हे नाव त्याच्या ओळखीसाठी उपयोगी पडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.