Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिंचोळी एमआयडीसी व कोंडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

चिंचोळी एमआयडीसी व कोंडी परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचे दर्शन

Surajya Digital
Last updated: 2021/07/27 at 11:27 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

विरवडे बु : चिंचोळी एमआयडीसी परिसरात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृश प्राणी दिसला. कामगार वर्ग कामासाठी रिक्षामधून जात असताना एमआयडीसीमधील एलएचपी कंपनी जवळील झाडीमधून रस्ता क्रॉस करत असताना एक बिबट्या सदृश प्राणी दिसून आला.

बिबट्या सदृश प्राणी दिसल्यामुळे कोंडी, चिंचोळी आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाच्या वतीने देण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग व वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरची टीम घटना स्थळी पोहचली. एमआयडीसी जागेची पाहणी केली असता ज्या ठिकाणी बिबट्यासदृश प्राणी दिसला त्याठिकाणी वनविभाग व WCAS च्या टीमला बिबट्या सदृश पायाचे ठसे आढळून आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मिळालेल्या प्राण्याचे ठसे एक्सपर्टना पाठवून दिलेले आहे. तरी एमआयडीसी परिसरातील कामगारांनी आणि नागरिकांनी सतर्कता बाळगावी. बिबट्या हा नेहमी रात्री वावरणारा प्राणी आहे. अत्यंत लाजणारा प्राणी , मिळेल त्या जागेत राहणारा व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी, वृक्षतोडीमुळे या बिबट्याने शेती हेच आपले राहण्याचे स्थान निवडले आहे.

घरालगत असलेली शेती व गुरांचे गोठे हे त्याला आकर्षित करतात. शेतीत सहज मिळणारे बेडूक, शेतक-यांच्या शेळ्या व मेंढ्या, कुत्रे ही त्याची मुख्य शिकार तसेच शेतीला पाणी द्यावे लागते, त्यामुळे पाण्याचाही प्रश्न सुटतो. वाढत्या इमारतींच्या जंगलामुळे व जंगलं नष्ट झाल्यामुळे त्याच्याकडे इतर पर्यायच उरला नाही. अशा वेळी बिबट्याचा वावर क्षेत्रात वावरताना काय काळजी घेतली पाहिजे. खालीलप्रमाणे वाचावे.

1) अशा क्षेत्रात फिरताना नेहमी घुंगराची काठी आणि बॅटरी सोबत ठेवा. कारण बिबट्या सहसा उजेडात येण्याचा प्रयत्न करत नाही आणि घुंगराच्या आवाजामुळे त्याला तुमची चाहूल लागेल आणि तो त्याचा मार्ग बदलेल.किंवा मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणे लावा.

२) बिबट्याने हल्ला केला की तो सर्वात पहिले तुमचा गळा पकडतो त्यामुळे चटकन माणूस जायबंदी होतो. त्यामुळे सहसा बाहेर फिरताना गळ्यात मफलर टाकून बाहेर पडा.

३) बिबट्या हा नेहमी त्याच्या उंचीच्या आणि त्यांपेक्षा छोट्या उंचीच्या प्राण्यावर पटकन हल्ला करतो. म्हणून शक्यतो घराबाहेर शौचास जाणे टाळा. शौचालयाचा वापर करा. कारण शौचास बसलेले असताना त्याचा हल्ला होऊ शकतो.

४) बाहेर अंगणात झोपणे टाळा. अंगनाला जमल्यास तारेचे कुंपण घालून घ्या.

५) आपल्या सर्व जनावरांना बंदीस्त गोठ्यात ठेवा. जेणेकरून जनावरांवर बिबट्याचा हल्ला होणार नाही.

६) आपल्या घराच्या आसपास उरलेले शीळ अन्न फेकू नका. कारण तिथं आसपास चे कुत्रे जमा होतात आणि नेमका त्यावेळी त्यांच्यावर बिबट्याचा हल्ला होण्याची शकता असते.

७) आपल्या घराच्या चारही बाजूंनी मोठे लाईट लावा म्हणजे बिबट्या घराच्या जवळ येणार नाही.

८) घराच्या आसपास जर ऊस किंवा अन्य पीक उंच वाढले असेल तर ते कापा. घर ते पीक कमीत कमी २० फूट अंतर ठेवा.म्हणजे तो घरा जवळ लपून बसणार नाही.

९) जवळपास कुठ बिबट्याची पिल्ल दिसले तर त्यांच्याशी छेडछाड करू नका. तात्काळ वन विभागाला कळवा. कारण तिथेच जवळपास बिबट्या असू शकतो. तिथून लवकरात लवकर निघून जा.

१०) आपली लहान मुलांना एकट्याला बाहेर पडू देऊ नका.

११) समजा बिबट्या अचानक समोर आला तर जोरात ओरडा, हातातील काठी जोरात खाली आपटा, त्यावर टॉर्च मारा.

१२) कुठल्याही अफवा पसरवू नका आणि अफवा वर विश्वास ठेवू नका.

१३) समजा तुमचे घर जर फार
एकांतात रानात असेल तर रात्री ७ वाजता क्या आसपास एखादा फ टाका फोडा म्हणजे तो त्या आवाजाने दूर पळून जाईन.

१४) सर्व काम शक्यतो दिवसाच करून घ्या रात्री बाहेर पडू नका.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Leopard #sightings #Chincholi #MIDC #Kondi #area, #चिंचोळी #एमआयडीसी #कोंडी #परिसरात #बिबट्या #सदृशप्राण्याचे #दर्शन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इंधन दरवाढीची टेन्शन मिटणार, आता चिकन वेस्टपासून बायोडिझेल
Next Article महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?