Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठी वेबसिरीजमधील कलाकार बाळासाहेबांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल, बार्शीत पेंटरची गळफास घेवून आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मराठी वेबसिरीजमधील कलाकार बाळासाहेबांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल, बार्शीत पेंटरची गळफास घेवून आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/08/01 at 10:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नातेपुते : लोणंद तालुका माळशिरस येथे बाळूमामाच्या कार्यक्रमात मराठी वेबसिरीजमधील नामांकित कलाकार बाळासाहेब उर्फ ह.भ.प.भरत शिंदे (रा. कांबळेश्वर, बारामती ) यांच्यासह ९ जणांवर नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधून करमणूक तर किर्तनातून समाज प्रबोधनाचे धडे देणारे ह भ प भरत शिंदे उर्फ बाळासाहेब  यांनी कोरोना परीस्थितीचे गांभीर्य विसरुन गर्दी जमवण्यास कारणीभूत ठरावे याबाबद त्याचे चाहते व जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सध्या कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थिती असल्याने माळशिरस तालुक्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने बंदी घातली  आहे. परंतु गुरुवारी (२९ जुलै ) लोणंद येथील  खताळ वस्ती येथे तानाजी आबा खताळ यांच्या शेतात बाळुमामाचे मेंढर बसवलेली होती. त्या ठिकाणी मराठी वेबसिरीज चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजमधील कलाकार ह. भ. प. भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कीर्तनाचे आयोजन राजेंद्र दगडू रुपनवर, संदीप राजेंद्र रुपनवर, रघुनाथ हिंमत रुपनवर, बापूराव ब्रह्मचारी रुपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ व दादासो शंकर शेंडगे यांनी केले होते. त्या ठिकाणी सुमारे सातशे ते आठशे लोकांची गर्दी जमा झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर लोणंद गावचे तलाठी संजय गोरे यांनी नातेपुते पोलिसात याबाबत फिर्याद दिली.तलाठी संजय गोरे यांच्या फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाण्यात या सर्वावर गुन्हा दाखल झाला.

तानाजी बाबा खताळ, राजेंद्र दगडू रुपनवर ,संदीप राजेंद्र रुपनवर ,रघुनाथ हिम्मत रुपनवर ,बापूराव ब्रम्हचारी रुपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ  (सर्व रा. लोणंद) दादा शंकर शेंडगे (रा. कण्हेर), भरत शिंदे उर्फ बाळासाहेब राहणार (कांबळेश्वर, बारामती) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल हांगे, माने,जानकर , घाडगे या पथकाने ही कारवाई केली.

 

* पेंटरची गळफास घेवून आत्महत्या

बार्शी : शहरातील बारंगुळे प्लॉट मध्ये राहणार्‍या फरीद महंमद शेख (वय 32) या पेंटरने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत मयताचे वडिल महंमद नानूमियॉं शेख यांनी शहर पोलिस ठाण्यास खबर दिली आहे.

फरीद शेख हे आपल्या वडिलांसमवेत पेंटरचा व्यवसाय करत होते. बारंगुळे प्लॉट मध्ये तावडे पिठाच्या गिरणीजवळ त्यांचे घर होते. ते आई-वडिलांसमवेत राहत होते. काल शनिवारी रात्रौ नेहमीप्रमाणे सर्वजण जेवण उरकून झोपले. सकाळी सहाच्या सुमारास महंमद शेख हे पाणी भरण्यासाठी उठले. त्यांनी सून हिना हिस उठविले असता फरीद दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी आसपास शोध घेतला. जुन्या घराकडे ते गेले असता दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पत्रा उचकटून पाहिले असता किचनमध्ये लोखंडी पाईपला फरीद याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #case #registered #including #artist #Balasaheb #Marathi #webseries, #मराठी #वेबसिरीज #कलाकार #बाळासाहेबांसह  #नऊजणांवर #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article #Olympics अभिनंदन! पी व्ही सिंधूने जिंकले ब्राँझ
Next Article लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन, काय असणार या सभागृहात

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?