Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाविकास आघाडीमध्ये कुरबुरीची चर्चा सुरू असताना दोन नेत्यांची भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीमध्ये कुरबुरीची चर्चा सुरू असताना दोन नेत्यांची भेट

Surajya Digital
Last updated: 2021/08/03 at 7:34 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमधील कुरबुरीची चर्चा सुरू असताना संजय राऊत आणि राहूल गांधी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. 12 तुगलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास बैठक झाल्याचे वृत्त आहे. राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केली असल्याचे संजय राऊत यांनी बैठक झाल्यानंतर सांगितले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची पहिलीच वन-टू-वन बैठक होती. खासदार संजय राऊत संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. दिल्लीमध्ये खासदार आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी होत आहेत. शिवसेना नेते आणि संजय राऊत यांनी दिल्लीत काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीवरुन महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याचे संजय राऊत यांनी स्वतः सांगितले आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती दिली आहे.

“खासदार राहुल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले” अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1422218540409491459?s=19

महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याचे दिसून येत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणूक काँग्रेसनं लढवल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची घेतलेली भेटीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसात राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये मतभेद झाल्याचे दिसून आलं होतं. खासकरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील या घडामोडींनंतर आजची राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. राज्यातील पुरपरिस्थितीच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा. मदत निधी तातडीने मंजूर करावा या मागण्या अर्थमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे, खासदार फौजिया खान उपस्थित होते.

संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज शिवसेना खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातल्या महापुराच्या संकटात विमा कंपन्यांनी व्यापाऱ्यांचा छळ थांबवावा. राज्याच्या मदतीसाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेचे संसदीय पक्षनेते संजय राऊत, लोकसभेतले गटनेते विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, यांच्यासह इतर खासदार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, फौजिया खान देखील यावेळी उपस्थित होते.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #Twoleaders #met #discussing #Kurburi #MahavikasAghadi, #महाविकास #आघाडीमध्ये #कुरबुरीची #चर्चा #दोननेत्यांची #भेट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रतिक्षा संपली; ‘बेलबॉटम’ चा ट्रेलर रिलीज
Next Article आमदार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जेऊरमध्ये ५०० जणांचे कोरोना लसीकरण

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?