नवी दिल्ली : पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरुन सभागृहात गदारोळ करणाऱ्या तृणमुल काँग्रेसच्या सहा खासदारांना आज राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. त्यांना दिवसभरासाठी सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे.
राज्यसभेत गोंधळ निर्माण करणाऱ्या तृणमूलच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते. तसेच ते वेलमध्ये उतरुन घोषणा देत होते. टीएमसी खासदार डोला सेन, नदीमुल हक, अर्पिता घोष, मौसम नूर, शांता छेत्री आणि अबीर रंजन अशी या खासदारांची नावे आहेत.
राज्यसभेत गोंधळ निर्माण करणाऱ्या तृणमूलच्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. हे खासदार वेलमध्ये उतरुन घोषणा देत होते. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना वारंवार बोलूनही ते शांत न झाल्याने त्यांना पूर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अध्यक्षांनी या सदस्यांना आपापल्या ठिकाणी परत जाण्याचे आणि कार्यवाही पुढे जाऊ देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सभासदांसमोर आलेल्या आणि फलक दाखवणाऱ्या सदस्यांची नावे नियम २५५ अन्वये प्रकाशित केली जातील आणि त्यांना दिवसभर निलंबित केले जाईल. तरी देखील गोंधळ थांबला नाही. त्यानंतर अध्यक्षांनी गोंधळ निर्माण करणाऱ्या सदस्यांना नियम २५५ अंतर्गत सभागृह सोडण्यास सांगितले.
संसेदच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून विरोधकांकडून पेगासेस मुद्यावर चर्चेची मागणी करण्यात येत आहे. विरोधीपक्षाच्या नेते, सरकारचे टीकाकार आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यासाठी पेगासेस सॉफ्टवेअरचा वापर झाल्याचा आरोप आहे. आज बुधवारी राज्यसभेत यावरुन गोंधळ दिसून आला.
राज्यसभेने दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी खासदार डोला सेन, नदिमुल हक, अर्पिता घोष, मौसम नूर, शांता छेत्री आणि अबीर रंजन बिस्वास यांना अव्यवहार्य वर्तनासाठी आजच्या सभागृहाच्या कामकाजामधून माघार घेण्यास सांगण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ६ टीएमसी खासदारांच्या विरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसमध्ये म्हटले आहे की, सहा टीएमसी खासदारांचे वर्तन सभागृहात पूर्णपणे अव्यवस्थित होते आणि म्हणूनच त्यांना सभापतींनी नियम २५५ अंतर्गत कामकाज सोडून त्वरित वॉकआउट करण्याचे निर्देश दिले आहेत.